प्रभात फेरी (morning walk)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सैल झाल्यावरती मॉर्निंग वॉकसाठी निघणारी प्रचंड गर्दी पाहून सुचलेली ही कविता कदाचित ही कविता त्यांच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करते .(जी मुर्खपणा आहे)
प्रभात फेरी मारू या
चला निरोगी राहू या
तोंडास मास्क लावुया
शुद्ध हवा नि घेऊया ॥
लॉकडाऊन संपला
चला चला चालायला
बुट ट्रॅक सूट घाला
त्वरा करा फिरायला ॥
तुज मिळे का मजला
जागा उभा रहायला
भीती आता ती कुणाला
पोलिस नाही रस्त्याला ॥
काय म्हणता कोरोना ?
झालाय आता तो जुना
बसलो घरी महिना
अंग वस्त्रात जाईना ॥
मरणारे ते मेले सारे
आम्ही सारे जगणारे
मास्क नावा पुरता रे
चला चला रे पळा रे ॥
होणारे ते होवू द्या रे
जन्म आहे जगण्याला
क्षण आज वाया गेला
पुन्हा मिळेना कुणाला ॥
जर का घरी बसता
आले असते वाचता
भरल्या नसत्या खाटा
दाटल्या स्मशान वाटा ॥
आज नाही तो उद्याला
येणार आहेच साला
तर चला जगायला
उद्याचे पाहू उद्याला ॥
डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा