रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८

दत्त अंगणी


दत्त अंगणी
********

मुंगीच्या पदी मी
चाले हळू हळू
प्रभू तू दयाळू
चालविता 

तमा ती कसली
नसे रे मजला
देवा तू वाटेला
सदा ठेवी

चालतांना पथी
सांभाळ करिसी
दानापाणी देशी
जागोजागी

खुंटताच मार्ग
झुळूक होवून 
नेशी उचलून
सुखरूप

विक्रांत चालतो
दत्ताचे अंगणी
जन्मांचे घेऊनी
पुण्य गाठी


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चित्र

चित्र ***** तुझ्या डोळ्यावरील  अर्ध पारदर्शक काचा मधून  नाही वाचता येत मला तुझे डोळे अजून  ती तुझी गंभीर आत्ममग्न मुद्रा  राहते ...