बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

दिप लाव डोळियात




नवी विटी नवे राज
तोच खेळ चाले आज

येतो अन जातो श्वास
जगण्याचा गमे भास

वाहतेय पाणी फक्त
उभा राहे उगा तट

आणि किती रातदिस
सारे ठाव अंधारास

खोलवर खुळी आस  
जन्म जणू गळफास

जोखडाचा अर्थ काय
कळण्यात वय जाय

आता तरी बांध तोड
ओला कर तुझा माठ

जीवनाशी पैज घेत   
दिप लाव डोळियात

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सार्थ करी दत्ता

सार्थ करी दत्ता ************ विश्वाचे कारण दत्त दयाघन  आहे मी जाणून मनी जरी  परी त्या कारणे होऊन  जगणे मीपण  सरणे घडेचिना  अशी म...