सोमवार, १३ ऑगस्ट, २०१८

तूझिया वाचून




|| तूझिया वाचून ||
**************

आता मी माझ्यात
तूझिया वाचून
क्षणांची बांधून
मोट चाले ||

कोरडे नयन
कोरडे मन
कोरडे जगणं
उदासीन ||

आटला धावा
आटली तहान
तमी हरवून
संवेदना ||

मिटली पाकळी
सुटली अंजुळी
हरवून गेली
प्रार्थना ही ||

दाटला अंधार
मिटला हुंकार
प्राक्तना सादर
अधोमुख ||

मनाच्या खेळा
होवून आंधळा
फिरलो गरारा
वाटे आता ||

विक्रांत पेटली  
जाणीव विझली
काळोखी गिळली
कुणी कैसी  ||

डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्दी व एकाकीपण

गर्दी व एकाकीपण ************** सोडुनिया घर येता पथावर  फलाटांची गर्दी घेता अंगावर  भयान एकाकी असतो आपण  अस्तित्वाचा होत नगण्यसा ...