मंगळवार, ९ जानेवारी, २०१८

दत्तोर्मी




****

नेतसे वाहून
उंच उडवून
पुन्हा आणून
देहा सोडी ||

येती या आनंद
उर्मीच्या लहरी
अज्ञात कुहरी
जन्मोनिया ||

चढणे पडणे
पडणे चढणे
असे हे जगणे
घडे काही ||

विक्रांत नाकळे
दत्ताचा  पसारा
उडतो भरारा
धुळी असा

तया न आडवी
मनाचे बंधन
देहाचे कुंपण
बांधलेले

जाहला  आसरा
जीवाचा निवारा   
वज्र तो पिंजरा
माझ्यासाठी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...