शनिवार, २७ जानेवारी, २०१८

त्रिमूर्ती दयाळ



कासाविस प्राण
उरी उलघाल
त्रिमूर्ती दयाळ
केवीं भेटे

मायेविन तान्हा
क्षुधेने व्याकुळ
रूदन केवळ
जाणतसे

भेदरे पाडस
होता ताटातूट
आर्त काळजात
पडे तैसे

मागे बहुतांसी
भेटला कृपाळ
जगण्याचा आळ
घालविला

म्हणून ही आशा
बांधली पोटास
लावला पणास
जीेव असा

उघड रे डोळा
वा मिटव डोळा
विक्रांत निराळा
ठेवू नको



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पदस्पर्श

पदस्पर्श ******* तुझ्या पायावरी ठेवीला मी माथा  अजूनही खरे न वाटते या चित्ता रुजुनिया स्पर्श हुळहुळे भाल  स्तब्ध झाले मन यंत्रवत...