सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

नवे अर्थ


नवे अर्थ
***********

जेव्हा तुझ्या हिरव्या 
ओल्या डोळ्यातून 
उडतात निळी पाखरे 
नाही कसे म्हणू मी 
माझ्या जीर्ण मनाला 
फुटतात नवे धुमारे 

विझलेल्या आगीला 
स्पर्शताच वारे 
उडाव्यात ठिणग्या 
पेटून निखारे 
तसे जागते चैतन्य 
अन
किर्र काळ्या अंधारात 
उमटती क्षणात
प्रकाश गोंदले 
नक्षत्र चेहरे 

जाणवते मला मी 
जिवंत आहे  अजून
मग जगण्याची उर्मी 
उरामध्ये घेऊन 
मनातील गाणे येते 
पुन्हा तरारून 

मागे राहतात पथ 
आकांत कोंडलेले 
उलगडते स्वप्न तेच 
युगोनयुगी पाहिलेले 
भरतात जखमा काही
सल जुने मिटतात 
जगण्याला कारण काही 
अर्थ नवे भेटतात 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीपाद सखी

श्रीपाद सखी *********** स्वप्न हरखले डोळीया मधले  स्वप्नास लंघुनी स्वप्न हे उरले ॥१ नभात लक्ष दीप उजळले  अन चांदण्याचे तोरण जाहल...