गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

हरवल्या वाटेवर



हरवल्या वाटेवर
निसटले हात होते
मांडलेल्या शब्दामध्ये
उसवले गीत होते

असण्याच्या खांद्यावर
जगण्याचे सोंग होते
मातीवर पसरले
उधळले रंग होते

भोवताली सजलेले
जुने तेच काही होते
कणोकणी सक्त पण
दाटलेले  नाही होते

बदलले रंग नवे
टाळणे डोळ्यात होते
ओळखीचे भास खुळे
मनही पुसत होते 

असो आता असलेले
मजलाही मान्य होते  
सुख दु:ख काय म्हणू  
जगणे सामान्य होते

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...