देहाची सरिता
दत्ताच्या सागरा
मिळूनी माघारा
नच यावी ||
आले गेले किती
आहाळ वोहाळ
करून गढूळ
जीवन हे ||
कितीएक आले
झरे इवलाले
देवूनिया गेले
सुख काही ||
विरले आठव
भेटलेली गाव
अपाराचा ठाव
खुणावतो ||
माझे मीपण हे
संपून जावून
तयात विरून
मी “ठ” व्हावे ||
विक्रांत वाहतो
दत्ताला स्मरतो
कल्लोळ करतो
अवधूता ||
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा