किती ओबडधोबड
वाटा तुझिया
गावच्या
फाटे फुटतात लाख
अन चाळण्या
पायांच्या
कधी दिसल्या
वाचून
हाका येतात कानात
जीव अधिरतो रोज
रोज सावल्या मनात
भय चकित आयुष्य
रोज मोजतेय क्षण
वाळू निसटून गेली
काही उरलेत कण
घट्ट लावूनी कवाडे
दूर बैसले वाटाडे
मरू पडून कडेला
लाख विख्रुली
हाडे
भाक पुढील
जन्माची
ती ही बरी आहे
म्हणा
आशा हीच नच जावो
उगा केलेला कुटाना
बघ बोलता बोलता
एक रुतलाच काटा
अहा अहा अरे दत्ता
शब्द ओठी ये विक्रांता
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा