शुक्रवार, २२ एप्रिल, २०१६

नाव बाबाचे घेवून




नाव बाबाचे घेवून
जय आपुला म्हणतो
भक्त चाणाक्ष चतुर      
फक्त हारात गुंततो

द्वेष जहरी मनात
राजकारण खेळतो
बळी जावो कुणी कसे
पोळी आपुली भाजतो

मने तुटतात अरे
नवी फाळणी घडते
जहांगिरी पुतळ्याची
राज्य शकट चालते

लढा मानव्याचा त्याचा
रोज असाच हरतो
दिले शस्त्र ज्यांच्या हाती
तोच स्वकीय मारतो

कधी होईल तो देव
नच त्यालाही कळले
एक्का हुकुमी कुणाचा
चाले जुगार ठरले

करता सलाम तया
जग एक नाकारते
जाता विसरून पुढे
दुजे बाणावरी घेते

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...