शुक्रवार, १७ जानेवारी, २०१४

कधी सुटेल हा देव







कधी सुटेल हा देव
खुळी अवघी उठाठेव
तडफडणारा जीव
शांत होईल ||१||
कधी होईल संसारी
मस्त दुनियादारी
गप्पा गाण्यात रात्री
धुंद घालवीन ||२||
नको जपाची कटकट
नको ध्यानाची खटपट
मजे करावी वटवट
विनाकारण ||३||
उच्च जीवनाचा ध्यास
कुणी लाविला मनास  
हाय अडकलो खास
मुर्खागतच मी ||४||
हजारात कधी कुणी
होय लॉटरीचा धनी
आपण कुठवर मनी
लाळ घोटावी ||५||
त्यांचा त्यांनाच होवो
लखलाभ उठाठेवो
आपण आपला टाहो
आटोपावा ||६||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपा (नर्मदाकाठ च्या कविता )

कृपा (नर्मदाकाठ च्या कविता ) ******* माई तुझी कृपा अनंत अपार  चाले पायावर देह माझा ॥ अगा हे चालणे असे तुझे देणे  अन्य न मागणे मज...