शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१३

असहायता माझी तुला



असहायता माझी तुला
कळत नाही असे नाही
तुझ्या नियम पुढे बहुदा
तुझा पण ईलाज नाही
ये इथे अन घे खांद्यावर
असे तर मी म्हणत नाही
जळणारी पावुले माझी
सावली मुळीच मागत नाही
तुला पाडावे उगा संकटी
असे मला वाटत नाही
काय करू पण हवास तू
आस काही सुटत नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

 

२ टिप्पण्या:

नट

नट **** ज्याचा पैशावर डोळा जो पद करी गोळा  काय करावे त्या गबाळा सांभाळून ॥ ज्याचा रुबाब इवला दिसे उसना घेतला  काय करावे त्या नटा...