गुरुवार, ४ जुलै, २०१३

प्रेम हवे तर






प्रेम हवे तर
अटी पूर्ण कर
फूट नाहीतर
इथुनिया ||||
ने फिरावयास
मज दूरवर
सुंदर सुंदर
देश दाखव ||||
गाडी हवी मज
घर हवे मज
नजराणा रोज
पेश कर ||||
हवे नटवणे
नवी प्रावरणे
सुवर्ण दागिने
यथोचित ||||
सारे रविवार
भटकू बाहेर
खाऊ मजेदार
नवे डिश ||||
आपण दोघेच
असू राजा राणी
तिसरे कुणी
नको मज ||||
असेल मंजूर
तर मी तुझी
अन्यथा गावची
शोध वधू ||||
असा रोखठोक
माझा व्यवहार
गमेल  व्यापार
तुज जरी ||||
तुही असशील
दमला शोधून
ये मग मोजून
दाम जरा ||||
फुकट मिळते
काय प्रेम ते
जीवन असते
घेणे देणे  ||१०||

विक्रांत प्रभाकर             
http://kavitesathikavita.blogspot.in/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...