गुरुवार, २१ मार्च, २०१९

दत्त ध्यानी




दत्त ध्यानी
***********


दत्त ध्यानी दत्त मनी
 दत्त कानी अविरत 

 दत्त घरी दत्त दारी
व्यवहारी दत्तनित्य 

दत्त जनी दत्त वनी
 वेटाळूनी कणोकणी

दत्त गाणं दत्त भान 
शब्द रान सुटलेले

 दत्त ओठी दत्त पोटी
 काठोकाठी भरलेला

 दत्ता पाहू कुठे कुठे 
विश्व रिते दत्ता विन

दत्ता देही श्वास होई 
प्रेम देई विक्रांता या


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

*************:


बुधवार, २० मार्च, २०१९

लायक तोच करतो


दत्त वाटेवर जन्म चालतो 
त्याच स्वप्नात नित्य जगतो ॥१॥

पुण्य खडावा ह्रदयी धरतो  
सदैव अलख अंतरी गातो  ॥२॥


दत्त मजला आपुला करतो   
अन या उरात प्रेम भरतो  ॥३॥


दत्त जन्म मरण वारतो
दुस्तर मायेतून निवारतो 

दत्त विक्रांता सदा सावरतो
त्याचिया लायक तोच करतो ॥५॥


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

*************:

मंगळवार, १९ मार्च, २०१९

दत्त शिणल्या डोळ्यात







दत्त शिणल्या डोळ्यात 
हाक पुनवेची येते 
माझ्या भिजल्या गळ्यात 
गाणे ओलेचिंब होते 

माझ्या पायथ्याच्या हाका 
का रे कानी येती क्षीण
करू नको रे अव्हेर 
तुझ्या पायी आला दीन

प्रीति माझ्या काळजाची
काही असेल ओखट 
किर्ति परी तुझी देवा 
बघ आहे ना चोखट

तुझ्या प्रीतीच्या स्वप्नात 
जन्म दिनरात जागा
 प्राण होऊन प्रतिक्षा 
भा डोळीयात उगा

कर काही येणे असे 
का पिंजल्या तनाचे
रो अस्तित्व जगाचे
क्षोभ मिटावे मनाचे

केला विक्रांत शहाणा
धडे जीवनात देत 
सारे सरो नको काही 
फक्त पायी राहू देत  

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे


सोमवार, १८ मार्च, २०१९

मनोहर पर्रिकर साहेब




मनोहर पर्रिकर साहेब
****************

माणसं येतात अन 
माणसं जातात 
जीवनाचे हे चक्र  
असेच चालू असते 
झाडा झुडपांचे जाणे 
हे कुणाच्या खिजगणतीत नसते
पण जेव्हा आधारवड उन्मळून पडतो 
तेव्हा हजारो पक्षांचा आकांत 
आसमंत भरून टाकतो
लाखो जीवांचा आश्रय हरवतो.
अन पार पार कोलमडून पडतो 
. . .
ते कलंदर जगणे 
ते निस्पृह वागणे 
ते व्रतस्थ राहणे 
हे तो योगीयांचे जगणे
भ्रष्टाचारी दलदलीत 
कमळाचे उगवणे 
दुरिताच्या तिमिरात 
पणतीचे मिणमिणणे
वादळातील घोंगावत
दीपस्तंभ बनणे
. . . .
असे जीवन जेव्हा जाते
अनंतात विलीन होऊन
माणुसकीचा हुंदका येतो
मनामनात दाटू 
कुणाचा जाण्याने 
पोकळी निर्माण होणे 
म्हणजे काय असते 
हे या मायभूमीला विचारून पाहा
गोव्याच्या लाल मातीला विचारून पाहा
त्या पोकळीला पर्रीकरांचे जाणे म्हणणे  
अन्यथा नाईलाजाने मानणे
 म्हणजे मनावर दगड ठेवणे आहे 
. . .  . . 
पण तरीही एक आशा आहे 
त्या महावृक्षाकडून 
विखुरले गेले असतील 
तसेच काही बीजकण
पेटल्या गेल्या असतील 
काही जोती शलाका    
घेऊन त्यांचे प्रकाशककण 
त्यांचे घडावे संवर्धन 
ते वाढावेत फोफावून  
हिच प्रार्थना साहेब तुम्हाला
द्या हेच आशिष आम्हाला
त्या आभाळून
त्या अव्यकातून.

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे


रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...