शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

दत्ता आठवावे





गुणगाण गावे | रूप रंग ध्यावे |
दत्ता आठवावे | प्रेमभावे ||१
कृपेचा सागर | पतिता आधार |
युग अवतार | कलिमाजी ||२
प्रेमळ माऊली | संकटी धावते |
नित्य सांभाळते | लेकुराते ||३
स्मरणे संतुष्ट | भक्तासी तिष्टत |
जणू की शोधत | कृपा संधी ||४
भावाने भिजला |  परीक्षे कसला |
तयाचा जाहला | तोची धन्य ||५

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

नर्मदा हाक







नर्मदा हाक
माझ्या मनात
गिरनार साद
माझ्या हृदयात

थकला देह
देहास वाहून
थकले मन
मनास ओढून

तोच विसावा
विश्व व्यापला
चैतन्य स्पर्श
हवा जीवाला

अधीर मन
देह उताविळ
पदी शृंखला
परी जडशीळ

अन प्रार्थना
येई उसवून
अस्तित्वाच्या
कणाकणातून


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५

दत्त कुळी







देव घेई रूपे  | भक्तांच्या कारणे |

भक्तीसी तो उणे | येवू न दे ||१||

साई गजानन | समर्थ शंकर |

कौतुक अपार | भक्तांसाठी ||२||

श्रीपाद वल्लभ | नरसिंह स्वामी |

चरित्र वाचून | जन्म तरे ||३||

माणिक प्रभू श्री | वासुदेवानंद |

भरला आनंद | दत्त कुळी ||४||

पुण्यासी फळलो | तया दारी आलो |

सकल पातलो | भक्ती प्रेम  ||५||



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/


मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

तुटलेला उंबरठा




जडावले पाय पुन्हा 
घराकडे वळतांना 
तुटलेला उंबरठा 
अडखळे पावूलांना 

तीच गाथा तीच व्यथा 
तेच शब्द जळलेले 
तेच मिष तेच विष 
तेच रक्त करपले  

कसा आणि किती वेळ 
खेळ असा चालणार 
एक एक दिस भार 
घाव वृक्ष साहणार 

अंतहीन गोष्ट जणू 
वेताळाची जन्मभर 
मर मर  रोज मर 
मनातल्या चितेवर 



विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...