गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१३

अंतरी तोच तो






अंतरी तोच तो l बाहेर तोची तो l

सर्वाघटी नांदतो l दत्तात्रेय ll ll  

सत्याच्या प्रकाशी l मिथ्याच्या अंधारी

सदा हात धरी l माझा देव ll ll  

प्रेमाने रागावे l थांबता हालवे l

चालत राहावे l मी म्हणुनी ll ll  

त्याचे सुख मनी l भोगे जनी वनी l

काही त्यावाचुनी l नच प्रिय ll ll 


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१३

आपलाही मूड कधी



आपलाही मूड कधी
अगदी मस्त असतो
शर्टवर आपणही
छानसा सेंट मारतो .१

कुणी वळून पाहतो
कुणी ओरडून जातो
आपण मुळी ढुंकून
कुणा पाहत नसतो .२

आपल्या मस्तीत शिळ
उगाच घालत जातो
ये जी वाट समोर
उनाड चालत जातो.३

असते कधी नसते
नच कारण शोधतो
जीवनावर आपण
अगदी खुश असतो.४
 
कुठलीशी आठवण
स्वप्नी कुठल्या रमतो
कुठली छान कविता
गुणगुणत बसतो   .५

कणाकणात दाटून
अवघा प्रकाश येतो
स्वत:साठीच आपण
मग मोठ्यानं गातो .६

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१३

श्रीदत्त नामाचे l





श्रीदत्त नामाचे l निधान भेटले l जीवास लाभले l महासुख ll ll
कैवल्य सुखाचा l महापूर आला l देहीच पाहिला l निर्विकार ll ll
श्वास प्रश्वासाच्या l जपे अनुष्ठिला l हरवूनी गेला l पाहणारा ll ll
शून्याच्या गाभारी l चैतन्य पुतळा l पाहिला मी डोळा l अनुपम्य ll ll
भाग्याचा सोयरा l जाहलो सहज l गेली गजबज l भवचिंता ll ll
जाहले कल्याण l माझिया जन्माचे l परत येण्याचे l नुरे काज ll ll
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...