जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१
कोरोना योद्धा
सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१
उशीर (उपक्रमासाठी)
रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१
पाहीले समर्था
शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१
गाडे
गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१
अक्का
बुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१
खुणा
खुणा.
*****
माझ्या मनातील खुणा
दत्ता पुसता पूसेना
व्रण स्मृतीचा खिळ्यांचे
खोल आतील मिटेना
इथे लपवितो काही
डाग बेपर्वा पडले
वस्त्र मलमली मृदू
जरी त्यावरी ओढले
दिला मुलामे वरती
बरे वाटे पाहताना
दोन दिसात परंतु
तडे पडती तयांना
आत जाणतोय परी
माझ्या साचल्या व्यथांना
जन्म दारभ्य वाहीले
त्याच त्याच कामनांना
तुवा दिधली घालून
जग चालवया रीत
देवा चुकलो चुकलो
नच झाले रे स्वहित
तुच करविता सारे
नीती नियमांचे द्वार
नाही म्हणत तुजला
तया अपवाद कर
करे विनंती दयाळ
एका नव्या आरंभास
जुने मोडून पडू दे
व्यापी तुच जीवनास
तुझा होवून विक्रांत
सदा राहो रे पदास
ओझे सुखांचे चुकांचे
नको आता या जीवास
*********
रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१
सावल्यांचे जग
दत्त पहावा
दत्त **** दत्त भजावा मनात दत्त पहावा जनात दत्त धरावा उरात सर्वकाळ दत्त जाणावा सुरात दत्त ऐकावा स्वरात दत्त वाचावा पदात अ...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
करुणा ******* करुणा दत्ताची वचने प्रेमाची रत्ने शब्दांची मनी येती ॥ दत्तकृपेचा हा भरा ये सागर लाटा लाटा वर उसळती ॥ तोच लिहवित...
-
जगण्याच्या वाटा ************* जगण्याच्या माझ्या वाटा दत्ता याव्या तुझ्या पथा वाहिलेला भार आता उतरावा तुझे हाता काय काय पोतड...
-
सार्थ करी दत्ता ************ विश्वाचे कारण तुच दयाघन आहे मी जाणून दत्तात्रेया परी तव कारणे केवळ जगणे मीपण सरणे घडेचिना अशी ...
-
हट्ट *** हाच हट्ट माझा पुरा करी देवा यावे भक्तीभावा फळ माझ्या जाणतो कोरडा तूप तेलाविन आलो मी घेऊन नैवेद्य हा फुले बाजाराची...
-
तेच तेच मागणे *********** तेच तेच मागणे रे पुन्हा त्याच देवालयी अरे कशा जात नाही या भिकारड्या सवयी धन देई यश देई गाई गुरे बळ दे...
-
बंध *** मी नच कुणाचा जरी जाणतो रे तरी वाहतो रे बंध उरी ॥ मित्र सखे प्रिय जपे नाती गोती जमे स भोवती गर्दी बहु ॥ वाहतो कर...
-
बैल. **** कुठे जातात ते गोऱ्हे आणि बैल कालवाडी सोबत जन्मा आलेले गाई सोबत वाढलेले . कधी खच्ची केलेले कधी मोकाट सोडलेले आम्हाला ...
-
गणित ***** गणित या जगताचे नाही कुणास सुटत सारे आकडे अस्थिर नाही कुणास कळत जगी कुणी फुशारतो पुण्य राही मिरवत दिसे तो ही सापडला...
-
दत्त कारणे **** घडो हे जगणे श्री दत्त कारणे अन्य न मागणे काही माझे घडावे एकदा दत्ताला भेटणे मी पण मिटने तया पायी स्वामी तो ज...