शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

बीज

बीज
****
मी घेवून चार बीजे 
आलो माळरानावर 
दूरवरच्या देशावर 
खरेच ते रखरखीत होते 
आणि पाहिले डोकावून 
तिथल्या दऱ्या खोऱ्या 
तर त्या बहरून गेलेल्या
हजारो लाखो 
विविध ज्ञात अज्ञात झाड झुडूपांनी 
तरीही माझी  बीज भरली ओंजळ
मी केली रिती 
त्या माळरानावर डोंगरावर
घळीत कुठल्या आड जागेवर
रुजेल कदाचित एकाध बीज 
येईन रुजून वृक्ष 

पण त्या सर्वभक्षी शेळ्या 
ते जगू देतील का?
दोन फूट सावली शेतात पडते म्हणून 
झाडाला अर्धे कपणारा शेतकरी
कसा वाढवू देईल त्यांना?
अन् चुलीसाठी फाटा गोळा करणारे
ते गरीब आदिवासी
वार करून विद्ध करतात 
ती झाडी त्या फांद्या ती खोडे 
त्यांना कोण थांबवणार ?
आणि हा खच इथल्या बिजांचा 
रुजणाऱ्या अन् मरणाऱ्या वृक्षांचा
त्यांना कोण वाचवणार?
का हे एक चक्र आहे 
अटळ अंतहिन विनाशाकडे जाणारे
उत्पत्ती स्थिती लय या साखळीतले 
आणि आमचे यत्न प्रयत्न 
आहे एक अरण्य रुदन 
किंवा स्व संतुष्टीकरण?

अर्थात स्व कर्म कधीच फळ मागत नाही.
***


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बीज

बीज **** मी घेवून चार बीजे  आलो माळरानावर  दूरवरच्या देशावर  खरेच ते रखरखीत होते  आणि पाहिले डोकावून  तिथल्या दऱ्या खोऱ्या  तर त...