सोमवार, ५ डिसेंबर, २०१६

दुर्गुणाचे मूळ




सर्व दुर्गुणांचे |
मूळ अहंकार
घाव तयावर
आधी व्हावा |।।|

राजा जिंकताच |
प्रजा हो लाचार।
शरण साचार |
येत असे।।।।

आखलेला मार्ग |
येतसे दिसून।
पाहतो शोधून |
विरळाच।।।

विक्रांता सज्ज
असे रणनीती ।
तलवार हाती |
उचलेना।।।।

म्हणे अवधूता |
करी निर्दालन।
सर्वस्व वाहून।
दारी तुझ्या।।।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 

शनिवार, ३ डिसेंबर, २०१६

क्षितीज भास







ती गर्दी ती माणसे
ते सूट ते बूट
ते अलंकार ती वर्दळ
ते रंग ते गंध
अन या सगळ्यात
कॅमेरागत
पुढे सरकणारे मन
होते क्षण क्षण टिपत
सारे निरखत
त्या कोलाहलाचा
एक भाग होवूनही  
त्यात वावरत
अलिप्तपणे ...

बाजूच्या क्रीडागंणावर
चाललेले क्रिकेट
फटक्यांची नजाकत
धावावर धावा  
पडणाऱ्या विकेट
सर्वत्र पसरलेली
धुळीची पुट
पण या जगाचे त्या जगाला
नव्हते सोयर सुतक....

आला तो गेला तो
एक पान दिवसाचे
उलटून पुढे सरकला तो
वेगळी जागा वेगळा ठसा
वेगळा रंग बस इतकेच
काळात निमाला एक सूर्यास्त
क्षितीज भास मागे ठेवत

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

दत्तराज



साकारी नटला
प्रकाशी भरला
असुनी नसला
दत्तराज ||

सोहं सांगाती
प्राणाचीया गाठी  
लहरी उठती
स्वानंदाच्या  ||

रूप रस गंध
चित्री सजवला
शब्दात ठेविला
नाद रूपे ||

असे दिगंबर
कृपेचा तो मेघ
सर्वांगात ओघ
स्पंदनांचा ||

कळू आले सुख
आता माझे मला
विक्रांत बुडाला
चैतन्यात  ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

नाटकी वैराग्य ...




--------------------- --------
म्हणे मी वाहीला
जन्म हा दत्ताला   
परंतु गाठीला
पुरचुंडी ||१||
दिसतेय माया
वस्तूचा तो लोभ
येईनात कोंब
विरक्तीला ||२||
करतो जतन
कारणा वाचून  
वाहतेय मन
चिंता वाया ||३||
हे तो वरवर
नाटकी वैराग्य
साधने अयोग्य
असे देवा||४||
करी कळवळा
उपट समूळ
आशेची ही वेल
मनीची या ||५||
मिळो तळवटी
भक्तीच्या मोहरा
वृतीचा निचरा
होवो साऱ्या ||६||
अशक्य ते काय
तुजला दयाळा
साऱ्या जगताला
चालविशी ||७||
व्हावा तदाकार
वृतीने विक्रांत
दत्त स्वरुपात
सर्वथैव ||८||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 
http://kavitesathikavita.blogspot.in

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...