सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४

ये सखे







उगाच रात्र सरली
उगाच स्वप्न तुटले
सखी तुझे भास मज
प्राणात क्षण झिंगले

किती दूर अचानक
सहज गेली निघूनी
विचारले न पुसले
हृदय विद्ध करूनी

येशील ना लवकरी  
खळाळत पुन्हा घरी
पाहता तुला भरेल 
घाव उगा झाला उरी

वाटेवरी डोळे माझे
अन कान पदरवी
ये सखे पुन्हा येवूनी
तरल स्वप्न जागवी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १७ ऑगस्ट, २०१४

हळूच ये


 


हळूच ये
माझे शब्द
गुपचूप
ऐकूण घे

ताईबाई
झोपताच
सामसूम
होताच

जरासेच
खोडकर
बोल तुझे
मला दे

फार काही
मागतो ना
गळा गळी
घालतो ना

वेडा आहे
वेडेपण हे
माझे जरा
समजून घे

हसतांना
गोड तुला
बोलतांना
ठोक तुला

माझे पण
तुझ्यामध्ये
हलकेच
हरवू दे

किती पाहू
वाट आता
आडोसा ही
ठरे बाधा

व्याकुळला
जीव माझा
संजीवन
स्पर्श तुझा

उभा  आहे
उन्हामध्ये
सावलीचे
छत्र दे

फार काही
नाही तर
स्माईलीची
भेट दे


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शोधात जन्म देवा



येवू देत कुठूनही 
सारी वेदनाच आहे 
विझविण्यास सामर्थ्य 
पण फुंकरीत आहे

हे जीवनाच्या  मालका 
देणे तुज  कर आहे
मरणकाळी अवेळी
सारे पण माफ आहे

प्रत्येक गाणे चांगले
रे असे कुठे होते का ?
सारे जुगारी जिंकति
असे कधी घडते का ?

वाटते तयांस की हा
साराच खेळ मजेचा
रुतती हाडात बेड्या
प्रकार असे सजेचा

सारेच ते सुज्ञ येथे
सारेच जरी जाणते
प्रत्येक प्रवचनात
सत्य दडुनी हासते

दे भीतीला मिठी किंवा 
 
कर भोवती गढी वा
घडणारे घडे अंती   
शोधात जन्म या देवा


डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, १६ ऑगस्ट, २०१४

अट कसलीच नाही










आज वेडी वाट माझी रिक्त उदास जाहली  
का न कळे सखी माझी अजुनी आलीच नाही

मांडवात फुले किती बहरूनी बाग गेली
गंध मोगरीचा धुंद मनी भिनलाच नाही

मी शब्द अंथरूनिया उभा असे हा कधीचा
उचलुनी त्या कधी ती वाह म्हटलीच नाही

नको भिउस जगाला उगा अथवा स्व:तला
सांग प्रीती तुझी तुज काय कळलीच नाही

नच रुपात प्रेम वा नच धनात प्रेम हे
ये अशी उगा उगाच अट कसलीच नाही

जगतात जगी लाख मरतात किती लाख
प्रीती वाचून परी ते सखी जगणेच नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...