सोमवार, १२ मे, २०१४

एका मदर्स डे ला






एक एक श्वासासाठी
आई धडपडत होती
ऑक्सिजन नळीतून
प्राण खेचीत होती

आणि पोरगा तर्रसा
बार मधून आलेला
लाल डोळे केस पिंजला
दारूमध्ये झिंगलेला

घाईघाईत तिच्या
सुवर्णकर्ण फुलाना
थबकला ना दुखता
ओढून काढतांना

अर्धवट ग्लानीत ती
मरणाच्या दारात ती
व्यर्थ प्रतिकार डोळी  
ओठी वेदनाच होती

त्या सोन्याची आता
दारूच होणार होती  
आईच्या डोळी गोष्ट
स्पष्ट दिसत होती

दुर्बल ती शब्दहीन
हातही हालत नव्हते
परि डोळ्यातील भाव
त्याला सांगत होते

निदान शांतपणे
अरे मरू दे..
मग घे रे ...
काय हवे ते..

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, ११ मे, २०१४

पॉवरफुल बाबा



गर्द भगव्या कपड्यातला
मोठी दाढी वाढवलेला
हिमालयी जावून आलेला
बाबा पॉवरफुल असतो
त्याचे मंत्र तयार शिजले
आशीर्वाद पक्के पिकले
घेतो दान जरी करोडो
परि धना कधी न शिवतो
आश्रम वासी तयार केले
घरदार ते सोडून आले
अष्टोप्रहर दिमतीला
मोठा फौजफाटा असतो
त्याचे फोटो त्याचे पुतळे
ताईत जडले अंगठी मधले
घरोघरी भक्तजनांच्या
मोठा देव्हाराही असतो
जागोजागी गल्लोगल्ली
शहरोशहरी गच्च भरले
या देशाचे भाग्य थोरले  
रतीब यांचा कधी न सरतो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



घुंगट आमिष..


जाळती विखारी नजरा
जर तसे वाटले तर
अन्यथा वाटते घेतात
उचलुनी पापण्यावर

कामुक आसक्त नजरा
नसतात असेही नाही
साऱ्याच सुवर्णावरी चोर
दृष्टी ठेवतो की नाही

मिरवणे यौवनास ही
विकृती नसेच काही
आदिम प्रेरणा असे
रंग भडक फुलांनाही

जे सांगती झाका पाका
वस्त्र आखूड घालू नका  
मानुन संस्कृती म्हणे मी
घुंगट आमिषच नसे का ?

विक्रांत प्रभाकर http://kavitesathikavita.blogspot.in/

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...