रविवार, १८ ऑगस्ट, २०१३

जीवनाचा पेपर



जीवनाचा पेपर माझा
तसा सोपा नाही
हुशार विध्यार्थी होतो
तेव्हा दया माया नाही
बालपणातील एक वाक्यात
सहज सुटत गेले
गाळलेल्या जागेत पौगंड
थोडे बिथरून गेले
नोकरीही थोडक्यात उत्तर
जरी देवून गेले 
लग्नाचे चूक कि बरोबर
अजूनही नाही कळले
दीर्घ प्रश्न आयुष्याचा
उभा आ वासून आहे
जीवन गुरु समोर अन
छडी हाती घेवून आहे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, १७ ऑगस्ट, २०१३

सर्दीने बंद असलेले नाक

 

सर्दीने बंद असलेले नाक
जेव्हा कशाने उघडते
स्वर्गाचे दार उघड्ल्यागत
सुख जणू ते वाटते
मोकळ्या श्वासात
आपल्या नेहमीच्या
किती सुख असते
हे हि तेव्हाच कळते
नाक बंद झाल्यावर
श्वास घेता येत नाही
नीट झोपता येत नाही
धड बोलता येत नाही
शिंकून शिंकून जीवाचे
हाल काही संपत नाही
रुमालाचे काय करायचे
सदा संकट डोई राही
अश्यावेळी डॉक्टर वैद्य
खरे देवदूत वाटतात
छोट्या छोट्या गोळ्या
त्या संजीवनी ठरतात
हुळहुळलेले नाक मग
लाख लाख दुवे देते
ड्रावजीनेस चे संकटहि
अगदी छोटे वाटू लागते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१३

बॉस रिटायर होतांना




हळू हळू वाढवलेल्या 
आपल्या साम्राज्यातून
होवून रिटायर   
जाणार आता सरकार
नाही म्हटले तरी
त्यांना दु:ख हे होणारच 
पण सरकार ते मुळीच 
नाही दाखवणार
तसे त्यांनी इथे
भरपूर काम केले आहे
भरपूर कमावले अन
भरपूर उपभोगले आहे
योग्य किती योग्य
काळे किती गोरे
खोटे किती खरे
सारे त्यांनाच माहित आहे
पण ज्या साम्राज्याची
उभारणी त्यांनी केली
त्याला हे जग सदैव
लक्षात ठेवणार आहे
त्यांच्या जाण्याने सुख नाही
दु:ख तर मुळीच नाही
एक गेला कि दुसरा येणार
राज्य तसेच चालू राहणार
सारे चाकर पुन्हा नवा एक
जयजयकार करणार

विक्रांत प्रभाकर  
http://kavitesathikavita.blogspot.in/





मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१३

ओथंबलेले आकाश



ओथंबलेले आकाश
वृक्ष वनराईवर
धुके गर्द निळेशार
झुले पानापानावर

कुंद प्रकाश रेंगाळे
लाल ओल्या कौलावर
माती नवीन गर्भार
बीज देतसे हुंकार

कुठे भुईत फुटले
झरे खळखळ वेडे
कडे कपारीत डोले
खुळ्या सृष्टीचे कोडे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

एक माणूस






तुटले जरी सारे जग 
एक माणूस तुटू नये
खोल खोल आपल्यात
आपण उरी फुटू नये
गच्च भरता वर्षाऋतू





पाणीकमी पडणारनाही
जळणाऱ्या दिवसातपण
घागर कुणी ओतणार नाही
मध्यरात्री संसाराच्या 





घराचा दिवा विझवू नको
वेडेपणा करून काही
वनात काठी हरवू नको
एक ओंजळ प्रेमाची





तिच्यासाठी फक्त ठेव
शिणून भागून येता
ती केसावरून हात फिरव




विक्रांत प्रभाकर


http://kavitesathikavita.blogspot.in/

  

सोमवार, १२ ऑगस्ट, २०१३

पराजयी जाळ्यात


दुःखाची वलय
हृदयाच्या खड्यात
स्वप्नांची प्रेत
कुजतात  त्यात

प्रारब्धाचे पक्षी
पराजयी जाळ्यात
रक्ताळला पाय
एकेका धाग्यात

उरी तडफडात
फक्त तडफडात
कोंडलेला उंदीर
फसव्या जाळ्यात

देवाचा धावाहि
हाकेच्या अंतरात
भोवताली आपली
परक्या नजरेत

यालाही काय 
जीवन म्हणतात
कश्यास  चाले  
व्यर्थ यातायात



विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, १० ऑगस्ट, २०१३

देही रसायन



सुटले सारे मन विटून
जुने भोगणे गेले विझून 
यांत्रिक स्पर्शे देही रसायन
तरीही धावते कळल्या वाचून
तुटल्या फुटल्या जीवा हवेपण
ठेवे जखडून मागितल्याविन
जातोय हरवून श्वास संपून
अतृप्त तरीही अजून जीवन  


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...