रविवार, १९ मे, २०१३

नर्मदा मैयास मागणे






एकच ती वाट मज
चालायची आहे आता
एकाच त्या काठावर
जगायचे आहे आता


जमविले सारे सारे
सांडायचे आहे आता
माई तुझ्या प्रेमी पुन्हा
भिजायचे आहे आता
 
येणे जाणे सारे सारे
तुझ्या कृपाबळावर
म्हणूनिया विनवितो
बोलाव ग लवकर  



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, १५ मे, २०१३

वाडीच्या रमणा l नृसिंह देवा l





तुझिया डोळ्यात l पहिली करुणा l
वाडीच्या रमणा l नृसिंह देवा ll ll
तुझिया कृपेची l एकच नजर l
भवाचा सागर l पार झाला ll l ll
कित्येक तरले l गतीस पावले l
भक्तीने जाहले l सुखी जन ll ll
जरी मी पतितl येताच शरण l
प्रेमे स्वीकारून l तारीयले ll ll

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



कुणाला कळेना





कुणाला कळेना l माझे आचरण l
आवघे वागण l वेडगळ l  l
पिता पत्नी पुत्र l सारे हसतात l
मित्र लाजतात l भेटावया l  l
अहो भाग्य माझे l सारे जाती दूर l
एकांतात सूर l लागे छान l  l
असाच समज l व्हावा सर्वा इथे l
बुजगावणे ते l व्हावे खरे l   l
मग मी नादात l एकटा नाचत l
राहील गात l गीते त्याची l  l

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



सोमवार, १३ मे, २०१३

सर्वव्यापी सर्वाकार !



शब्द लाचार मिंधे
काही सांगत नाही l
रूप अर्धे अधुरे
काही दावत नाही l
तुज जाणूनिया मी
मज गावत नाही l
सर्वव्यापी सर्वाकार
तूही तूही अन मीही l

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रूपावाचून




रूपावाचून तुला
पाहियले मी l
शब्दावाचून तुला
ऐकीयले मी l
माझ्यावाचून तुला
जाणीयले मी l
कुणा सांगाया काही
नच उरले मी l

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

इतुकेच असे मागण !




सारे अस्तित्व प्रकाशान
जावू दे भरून
या कणाकणातून बहरून
येवू दे चैतन्य
माझेपण तुझ्यात हरवून
संपू दे प्रश्न
इतुकेच असे मागण
सरू दे शोधण
आणि तुझ्या कृपेन
कळू दे जीवन

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




कैसा दत्ता तुझा




कैसा दत्ता तुझा l पडला विसरl
जळो व्यवहार l माझा आता ll ll
काम धंदा उगा l घेतला बोडखी l
केली मानतुकी l घेण्या देण्या llll
म्हणवितो भक्त l रचितो कवित्व l
परी असे रिक्त l घडा माझा ll ll
गेला किती काळ l तुझ्या विस्मरणी l
लागली टोचणी l माझ्या जीवा ll ll
तुची माय बाप l करावी करुणा l
माझिया स्मरणा l नित्य यावे ll ll
हाती असो हात l पाय चलो साथ l
नाम तुझे गात l रात्रंदिन ll ll

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...