बुधवार, १५ मे, २०१३

कुणाला कळेना





कुणाला कळेना l माझे आचरण l
आवघे वागण l वेडगळ l १  l
पिता पत्नी पुत्र l सारे हसतात l
मित्र लाजतात l भेटावया l २  l
अहो भाग्य माझे l सारे जाती दूर l
एकांतात सूर l लागे छान l ३  l
असाच समज l व्हावा सर्वा इथे l
बुजगावणे ते l व्हावे खरे l  ४  l
मग मी नादात l एकटा नाचत l
राहील गात l गीते त्याची l ५  l

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दरवळ

दरवळ  ******* शब्द काही दिलेस मला  तू  रांगोळीत रंग भरतांना  अन् स्वप्न नव्या जगण्याचे तम प्रकाशी विरघळतांना ॥ थरथरले मृदू ओठ तु...