सोमवार, १३ मे, २०१३

कैसा दत्ता तुझा




कैसा दत्ता तुझा l पडला विसरl
जळो व्यवहार l माझा आता ll १ ll
काम धंदा उगा l घेतला बोडखी l
केली मानतुकी l घेण्या देण्या ll २ll
म्हणवितो भक्त l रचितो कवित्व l
परी असे रिक्त l घडा माझा ll ३ ll
गेला किती काळ l तुझ्या विस्मरणी l
लागली टोचणी l माझ्या जीवा ll ४ ll
तुची माय बाप l करावी करुणा l
माझिया स्मरणा l नित्य यावे ll ५ ll
हाती असो हात l पाय चलो साथ l
नाम तुझे गात l रात्रंदिन ll ६ ll

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नाना पाटेकर

नाना पाटेकर ********** नाना,  जरी पंच्याहत्तर वर्षाचा होतास  तरी फार लवकर गेलास अचानक गेलास  सुपर स्टार होतास  पण सदैव घरातला वा...