बुधवार, १५ मे, २०१३

वाडीच्या रमणा l नृसिंह देवा l





तुझिया डोळ्यात l पहिली करुणा l
वाडीच्या रमणा l नृसिंह देवा ll १ ll
तुझिया कृपेची l एकच नजर l
भवाचा सागर l पार झाला ll l२ ll
कित्येक तरले l गतीस पावले l
भक्तीने जाहले l सुखी जन ll ३ ll
जरी मी पतितl येताच शरण l
प्रेमे स्वीकारून l तारीयले ll ४ ll

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दरवळ

दरवळ  ******* शब्द काही दिलेस मला  तू  रांगोळीत रंग भरतांना  अन् स्वप्न नव्या जगण्याचे तम प्रकाशी विरघळतांना ॥ थरथरले मृदू ओठ तु...