गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१३

ॐकाराचा हुंकार





ॐकाराचा हुंकार l प्रगटला साचार l
होऊनि देहाकार l देव गजानन ll ll 
भावातीत ईश्वर l तया फुटे पाझर l
प्रेमलोट अपार l द्वैत सुखाचा ll ll 
अरुपाचा अनघट l पडदा सारत l
झाले घनीभूत l कैवल्यरूप ll ll 
आनंदाचा कल्लोळ l सूर शब्द ताल l
अनाहताचा बोल l झाला प्रगट ll ll 
रूप साजिरे घेवूनी l आले गुणातीत गुणी l
रक्त वर्णात सजुनी l पर्ण पिंपळावरी ll ll 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

अंतरी तोच तो






अंतरी तोच तो l बाहेर तोची तो l

सर्वाघटी नांदतो l दत्तात्रेय ll ll  

सत्याच्या प्रकाशी l मिथ्याच्या अंधारी

सदा हात धरी l माझा देव ll ll  

प्रेमाने रागावे l थांबता हालवे l

चालत राहावे l मी म्हणुनी ll ll  

त्याचे सुख मनी l भोगे जनी वनी l

काही त्यावाचुनी l नच प्रिय ll ll 


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१३

आपलाही मूड कधी



आपलाही मूड कधी
अगदी मस्त असतो
शर्टवर आपणही
छानसा सेंट मारतो .१

कुणी वळून पाहतो
कुणी ओरडून जातो
आपण मुळी ढुंकून
कुणा पाहत नसतो .२

आपल्या मस्तीत शिळ
उगाच घालत जातो
ये जी वाट समोर
उनाड चालत जातो.३

असते कधी नसते
नच कारण शोधतो
जीवनावर आपण
अगदी खुश असतो.४
 
कुठलीशी आठवण
स्वप्नी कुठल्या रमतो
कुठली छान कविता
गुणगुणत बसतो   .५

कणाकणात दाटून
अवघा प्रकाश येतो
स्वत:साठीच आपण
मग मोठ्यानं गातो .६

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...