गुरुवार, १० जानेवारी, २०१३

स्मर्तृगामी प्रभू





काय तुझी देवा|सरली ती दया|मज गरीबा या|लाथाडीसी ||||

अहो चक्रपाणी|कमंडलू धरा|पदीचा आसरा|द्यावा मज ||||

नको धन मान|नको यशोगान|पायीचा तो श्वान|करी मज ||||

बोधिले यदुशी|तैसे अंगीकारा|संसार पसारा|आवरा हा ||||

स्मर्तृगामी प्रभू|ऐशी तुझी कीर्ती|आणि टाहो किती|फोडावा मी ||||



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

लिहायचे कुणासाठी




लिहायचे कुणासाठी

लिहायचे कश्यासाठी

शेवाळल्या तळ्याकाठी

जड जड झाली दिठी

सुकलेल्या पानावरी

उदासली सांज सारी

मनातली अक्षरे ही

मनाआड गेली सारी

वेदनांत मरतांना

वेदनांचे गाणे झाले

ऐकतांना दूर कुठे

कुणा डोळी पाणी आले



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, ९ जानेवारी, २०१३

अभंग आत्मप्रभा



अभंग  आत्मप्रभा



तुझिया कृपेचा|प्रवाह माझ्यात| हळूच वाहत|आहे आज ||||

आणिक पावुले|आहेत वळत|माझ्या नकळत|तुझ्या कडे ||||

संपले माझे ते |उगा रागावणे|फुका खंतावणे |तुझ्या विना ||||

तूच गळ्यातून|काढून लोढण|टाकिले करून|मुक्त मला  ||||

पाहतोय मीच|होऊन चकित|काय विपरीत| होते केले  ||||

लोढण्या मानिले|प्रिय आपुले|अन नाकारीले|चैतन्याते  ||||

मिटली भ्रमाची|अवघी काजळी|दाटली कोवळी|आत्मप्रभा  ||||



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

कसे रामराया



कसे रामराया तुम्हाला पाहावे

गुणांच्या गुढाला कसे आकळावे  ||

कळेना तरी शोधण्या मीच धावे

पडोनी प्रयासी पुन्हा नी झटावे ||

असे का हि क्रीडा कुणाची कळेना

अश्या थोर काजा कुणी का धजेना ||

कशी भ्रांती कैदाशिणी घोर माया

गुंडाळूनि ठेवे पदासी जगा या  ||

असे या जगाचे तुम्ही राम स्वामी

तरी का भिकारी तुझे भक्त आम्ही ||

अहो धाव घाला जना वाचवावे

तुची सांग आम्ही कुणा बोलवावे ||

पडो देह आता तुला शोधतांना

असे लांछना भोग ते भोगतांना ||





विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...