क्रिकेट
******
कुणी एक तो त्वेषाने
चेंडू कुणाकडे
फेकतो
कुणी एक तो
फळीच्या
तुकड्याने
त्याला दूर
फटकारतो
त्याचा मागे
धावतात दहाजण
नियमात
बांधलेल्या
जणू यंत्रागत
अन त्याच त्या क्रियेत
राहतात फिरत
तिथे
प्रेक्षागृहात
बसलेले हजारोजन
दूरचित्रवाणी संचाच्या
समोर बसलेले
लाखोजन
धावाच्या काल्पनिक संज्ञेत
रममाण होत
पाहत राहतात
तो तमाशा
पदरचे पैसा आणि
अमूल्य वेळ खर्च करीत
ती झिंग तो आवेश
ते हरणे ते
जिंकणे
ते रडणे ते नाचणे
त्या क्षणी खरे
असते
शिरे वाचून
रक्तात
अड्रेनालीन
घुसवणे असते
आणि रोजचे
धोपट कंटाळवाणे
जगणे
विसरणे असते .
पण तो प्रत्येक
आवेश
संपणारा असतो
किनाऱ्यावर
फुटणाऱ्या
लाटेसारखा
क्षणिक ठरतो
यातून कोण काय
कमवतो
अन कोण काय
गमावतो
हे ज्याचे
त्यालाच
ठावूक असते .
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा