जाणुनी अद्वैत । द्वैती मी रमतो ।
प्रेमें आठवतो । गुरुदेवा ।।
लागला से छंद । मनाला प्रीतीचा ।
भक्तीच्या रूपाचा ।ऐसा काही ।।
मधू लागे इक्षु ।शर्करा गुळात ।
परी आवडीत ।भिन्नता ही ।।
मांडली पूजा । सजला देव्हारा ।
पूजक पुजारा ।भेद नाही ।
विक्रांत रंगला । भक्तीत दंगला
अंतरी एकला । एकपणी ।।
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा