बुधवार, ९ मे, २०१८

कणभर कृपा




कणभर कृपा
********

कासावीस जीव
होई रात्रंदिस
देवा का उदास
तुझी माया ॥

तुवा का न येई
माझी आठवण
कृपेसी कारण
सापडेना ॥

गाठी नाही तप
कमी पडे जप
साठवले पाप
हटेना का ॥

प्रभू गिरणारीं
पाहू नको अंत
हताश विक्रांत
तुझ्याविना ॥

कणभर कृपा
करी दिनावर
दावी क्षणभर
पदे तुझी  ॥


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चित्र

चित्र ***** तुझ्या डोळ्यावरील  अर्ध पारदर्शक काचा मधून  नाही वाचता येत मला तुझे डोळे अजून  ती तुझी गंभीर आत्ममग्न मुद्रा  राहते ...