शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०१५

व्यर्थ अध्याय नवा





जगण्याचा अर्थ मागे
रोज तुझ्या दारावरी
आणि मिळे रोज तोच
प्रसाद या हातावरी

तेच तेच कितीवेळा
शिणलेले दु:ख जीवा
अन चाललेला तुझा
व्यर्थ अध्याय नवा

किती तर्क सिद्धांत ते
कशालाच अर्थ नाही
अरे तुझ्या तेजाने त्या
दिवाही पेटत नाही

धावणारे धावतात
कावणारे कावतात
परी अंती मसणात
त्या तसेच जळतात

चल जातो आज पुन्हा
येणे सुटणार नाही
यंत्रवत शिणलेले
शब्द थांबणार नाही  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...