शनिवार, २८ जून, २०१४

मेंदी जरा अजून रंगू दे






नाजूक तुझ्या हातावरली
मेंदी जरा अजून रंगू दे
कुठल्या वेड्या खुळया जीवाची
प्रीत जरा अजून रंगू दे

थोडी जुनाट बेलबुटीही  
ना आवडली तरी राहू दे
नक्षीहून खुलणे मेंदीचे
सखी जगाला जरा पाहू दे

कधी तरी मग ते मेंदीचे
हात हातात अलगद दे
तनामनातील प्रेमवीणा
मुक्तपणे अन झंकारू दे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, २७ जून, २०१४

ती स्थळाचे सांगताच



ती स्थळाचे सांगताच 
प्रभा मनातील काजळते
वेडे हृदय का न कळे    
इतके असे कुणात गुंतते
आवडणे तिचे मनाला    
अगदी खरेखुरे असते
आणि झुरणे मनातील  
विलक्षण सुंदर असते
हवेपणाला त्या माझ्या
हट्टाचे जरी कोंदण नसते
तिच्या वाचून जगणे पण
एक असह्य शिक्षा असते
हजार भिंती हजार अडसर
भयकंपित मन कातर होते
पण जुगारी डाव लागता  
जगणे मरणे हाती नसते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, २६ जून, २०१४

मेहरनजर





हजार वाटा तुझ्यासाठी
रथ हजारो रस्त्यावर
हजार हृदय अंथरली
फिदा रेखीव चेहऱ्यावर

लाखामध्ये असशी तू
जादू लाखो मनावर
लाखो शब्द माझे सखी
व्यर्थ तुझ्या असण्यावर

येशील कधी माझ्यासाठी
जाशील अथवा दूरवर
जगतो कविता तुझ्यामुळे
भाग्य मजवर मेहरनजर

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २५ जून, २०१४

नकोस विचारू मजला जाऊ का




नकोस विचारू
मजला जाऊ का
हो म्हणता सखी  
ग, येतच नाही |
तुझा निरोपी
चेहरा स्मरता
शब्द मुखातून
फुटतच नाही |
असो सभोवती
तुझी गुणगुण
तयावीण मज
सुचतच नाही |
तव शब्दातील
गोड रुणझुण
आणखी जीवास  
कळतच नाही |
असतो क्षणांचा
वेग अनावर
काळ हळू हळू 
का होतच नाही |
उद्या घडे काय
कुणास ठावूक
हात हातातून   
सुटतच नाही |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

sunnayna.r.patel@gmail.com

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...