जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
शनिवार, २४ मार्च, २०१८
मंगळवार, २० मार्च, २०१८
स्वामी देव माझा
स्वामी देव माझा
देव माझा देव माझा
देव माझा रे
स्वामी देव माझा रे
समर्थ देव माझा रे
अक्कलकोटी
अक्कलकोटी
राहत आहे रे
मजला पाहत आहे रे
सांभाळत आहे रे
जनी वनी घरी दारी
घेऊन या कडेवरी
मजला नेत आहे रे
सदैव सोबत आहे रे
रागावून बळे कधी
जोजारून बळे कधी
सांगत भक्ती आहे रे
भरवत घास आहे रे
हिंडे फिंडे उंडारे मी
अडे कुठे भटके मी
ठेवीत ध्यान आहे रे
आणत मार्गी आहे रे
पडतो मी घडतो मी
पुन्हा पुन्हा रडतो मी
हरतो मी चिडतो मी
सदा सावरत आहे रे
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
शनिवार, १७ मार्च, २०१८
दुरावल्या मितास
दुरावल्या मितास
*************
नशिबाने कधीकधी
मित असे मिळतात
न मागता जीवनात
स्वर्ग जे फुलवतात ।
कळत नकळत जे
जिवलगही होतात
तरी का न कश्याने
दूरावलेही जातात ।
काही गैरसमज वा
संशय काही येतात
मैत्रीलाच मैत्रीचे ते
ओझे मानून जातात ।
त्यांचे जीवनात येणे
जीवन उमलून जाणे
परी कथेहून जणू
असते लोभसवाणे ।
त्याचे निरपेक्ष देणे
जणू वरदान होते
त्याचे सोडून जाणे
प्राप्त प्रारब्ध ठरते ।
मिळता मित म्हणून
सोबत असे तोवर
हा माझा वेडा जीव मी
ओवळतो त्याच्यावर ।
अन गेला दूर जरी
मनी दुवा उमटतो
सदा रहा सुखी यार
आयुष्य तया मागतो ।
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
शुक्रवार, १६ मार्च, २०१८
भाग्य माझे (नर्मदाकाठच्या कविता)
भाग्य माझे (नर्मदाकाठच्या कविता)
काखेमध्ये झोळी
हातात या काठी
नर्मदेच्या तटी
चालतो मी ॥
एकेक पाउली
नर्मदा गजरी
पातकांची सारी
पळे सेना ॥
माईच्या कुशीत
सुखाची पहाट
घरे काठोकाठ
समाधान ॥
अहो भाग्य जणू
जहाले प्रसन्न
घडले दर्शन
मैयेचे हे ॥
इथल्या किनारी
थांबावे वाहणे
घडावे चालणे
विक्रांतचे ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
मंगळवार, १३ मार्च, २०१८
एक घोटाळा
एक घोटाळा
🙄🙄🙄🙄
एकच फक्त
भारी घोटाळा
मजला इथे
करता यावा
😀😀😀😀
कुणा कुणाला
कळल्याविना
नवसा माझ्या
देव पावावा
🤗🤗🤗🤗
एका करोड
मध्ये असती
शुन्य किती ते
माहीत नाही
🤔🤔🤔🤔🤔
असे हजारो
म्हणजे किती
वेड्यागतच
होतय काही
😅😄😆,😍
कुणा हवीय
ढोर मेहनत
उगा कष्टणे
रक्त जाळत
🤓🤓🤓🤓
कढण्याआधी
हळूच घ्यावा
लोणी गोळाच
संधी साधत
😉😉😉😉
देतील शिव्या
त्या देऊ द्यावे
नाव गाव ते
कुणास हवे
😇😇😇😇
येथ दिव्य जे
शिकले क्लुप्त्या
त्या गुरूदेवा
सदा नमावे,,?
,😎😎😎😎
,😂😂😁😁
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
सोमवार, १२ मार्च, २०१८
पाहुणा
पाहुणा
मिटलेल्या पापणीत
जगण्याच्या वाटा साऱ्या
वेड्या पदा खुणावती
गिरनारच्या पायऱ्या ॥
गोपीचंदनाचा टिळा
माळ तुळशी टपोरी
माझी ज्ञानोबा माऊली
ओढ लागली अंतरी ॥
कसे थांबवू प्राणास
देही असोनि विदेही
सवे चालतोय काळ
मज भान ते हि नाही ॥
झालो चंदनी बाबुळ
सारे अर्पीतो धुनीला
घेई लपेटून मला
वर्ण सुवर्ण देहाला ॥
जगा दिसतो विक्रांत
खेळ चालला जन्माचा
झालो पाहुणा कधीच
मी या राहत्या घराचा ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
शुक्रवार, ९ मार्च, २०१८
वय वाढता
वय वाढता
आपण मोठे होतो
म्हणजे काय होते
हे देहाचे यंत्र
फक्त थोडे जुने होते
पण या मनाचे खळखळणे
कधीच थांबत नसते
आणि आपल्या आतील
ते अनुभवने
अजूनही चालू असते
ती मंद हवेची थंड लहर
तो ओल्या मातीचा सुवास
निळ्या नभातील टपोरा चंद्र
अगणित उल्कांची आरास
आंब्याचा मोहोर
प्राजक्ताचा सडा
सागाराची गाज
सुर्यास्ताचा साज
देवळातील कीर्तन
वासुदेवाचे भजन
चिवचिव णारा पक्षी
फुलांची नक्षी
या आणि अशा कितीतरी गोष्टी
जोवर जुन्या होत नाहीत
तोवर आपण राहतो
ते तसेच षोडशीचे चिरतरुण
विस्फारलेल्या नजरेचे
सुखाने बहरुन आलेले
आनंदाने फुलून गेलेले
जीवन होवून
या जगातील गंध
मला बेहोश करतात
या जगातील रंग
मला हरवून टाकतात
या जगातील स्वाद
मला ओढत नेतात
त्यांचा त्याग करायचा
विचारही माझ्या मनात
येत नाही कधी
या तृप्त आणि अनेक अतृप्त
आकांक्षा इच्छा आणि स्वप्न
घेऊन मी जगत आहे
हे ऊन सावलीचे जगणे
किती सुंदर आहे
हे मला असलेले
माझ्या जगण्याचे भान
याहून सुंदर काही असेल
असे खरेच मला वाट त नाही.
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
आपण मोठे होतो
म्हणजे काय होते
हे देहाचे यंत्र
फक्त थोडे जुने होते
पण या मनाचे खळखळणे
कधीच थांबत नसते
आणि आपल्या आतील
ते अनुभवने
अजूनही चालू असते
ती मंद हवेची थंड लहर
तो ओल्या मातीचा सुवास
निळ्या नभातील टपोरा चंद्र
अगणित उल्कांची आरास
आंब्याचा मोहोर
प्राजक्ताचा सडा
सागाराची गाज
सुर्यास्ताचा साज
देवळातील कीर्तन
वासुदेवाचे भजन
चिवचिव णारा पक्षी
फुलांची नक्षी
या आणि अशा कितीतरी गोष्टी
जोवर जुन्या होत नाहीत
तोवर आपण राहतो
ते तसेच षोडशीचे चिरतरुण
विस्फारलेल्या नजरेचे
सुखाने बहरुन आलेले
आनंदाने फुलून गेलेले
जीवन होवून
या जगातील गंध
मला बेहोश करतात
या जगातील रंग
मला हरवून टाकतात
या जगातील स्वाद
मला ओढत नेतात
त्यांचा त्याग करायचा
विचारही माझ्या मनात
येत नाही कधी
या तृप्त आणि अनेक अतृप्त
आकांक्षा इच्छा आणि स्वप्न
घेऊन मी जगत आहे
हे ऊन सावलीचे जगणे
किती सुंदर आहे
हे मला असलेले
माझ्या जगण्याचे भान
याहून सुंदर काही असेल
असे खरेच मला वाट त नाही.
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
दिगंबर आजबे
स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
म्हटले तर सुखी आहे ती म्हटले तर दु:खी आहे ती तेच नाणे जीवनाचे अन छापाकाटा खेळत आहे ती छापा सुख अन काटा...
-
मस्तवाल ... तोंडा मध्ये काहीबाही चघळत चोखत अन थुंकत अजस्त्र देह धडधाकट येती पुढे सरसावत ...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
सरदार ****** दरबारातून कायमचेच जाता जाता निघून कटू घोट अपमानाचा गेला सरदार गिळून ॥ १ खंत होती जरी न दाखवली चेहऱ्यावर होयबांच्य...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
करतो वल्गना भक्तीच्या वाचाळ रिता मी पोकळ ढोल जगी || दुमदुमे जगी बसे कानठळ्या आवेशी आरोळ्या घुमे स्वरी || कळतोय...
-
आरसा ****** तुझिया डोळ्यांनी मीच मला पाहतो वादळ संवेदनांचे कणाकणो वाहतो कविता तुझ्यावरी लिहून सुखी होतो तुला खुश करतो का मीच ...
-
स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...
-
कृपेचा ****** राखला हा देह माझा दत्तात्रेये हरवली त्राये एक एक ॥१ अन्यथा असता कधीच सुटला फुगा हा फुटला कुण्या क्षणी ॥२ कितीदा...





