मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

दत्तव्यापी







दत्त गाण्यात बोलतो
दत्त पाण्यात वाहतो
दत्त कानात सांगतो
गुज त्याचे ||१ ||
दत्त आकाश मोकळे
दत्त आभाळ सावळे
दत्त सोनेरी कोवळे
सूर्यबिंब ||२||
दत्त मूर्तीत सजला
दत्त विश्वात भरला
दत्त भक्तास दिसला
अंतर्बाह्य ||३||
दत्त जीवन विराट  
दत्त सूक्ष्मातली वाट
दत्त उदेली पहाट
उन्मेषाची ||४ ||
दत्त हृदयाची गती
दत्त श्वास पुकारती
दत्त म्हणू किती किती
तृप्ती ये ना ||५ ||
दत्त भजिला जगात
दत्त पाहिला मनात
दत्त तत्व स्वरुपात
विक्रांतच्या ||६ ||

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in


सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

मांजर मुखी मेला उंदीर






आला उंदीर गेला उंदीर
मांजर मुखी मेला उंदीर
उंदराला त्या ठावूक होते
दारी असते उभी मांजर
कधीतरी ते खाणार तया
तरीही त्याचा चाले वावर  
पोटामधली भूक मारते
मारवते ही जन्म लाचार
मी ही शोधतो माझे मांजर
कळल्याविना भिते नजर

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


पोटासाठी कुणी

पोटासाठी कुणी | गोतासाठी कुणी |
संसारी खिळूनी| राहिलेला ||
देह जाईस्तोवर | पोट राहणार |
गोत वाढणार | प्रतिदिनी ||
किडा मुंगीयांचे | पोट भरे रोज |
पाखरास भोज | फळादिक ||
मागे धुंडू जाता | जग गणगोत |
बांधले सूत्रात | विश्वरूपी ||
निघ रे विक्रांत | दारी यमदूत |
सारी यातायात | व्यर्थ मग ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

उदास







जाई खोल खोल हलल्यावाचून
मनाची सोडून खुण गाठ ||
कळू कळू आले शब्द वेचलेले
कळेना अडले जग कैसे  ||
मनाला मरण टाकले देवून  
देहास ठेवून प्रारब्धासी  ||
विक्रांत ओसाड सजलेले घर
उदास व्यापार देहधर्मी ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...