जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६
पोटासाठी कुणी
पोटासाठी कुणी | गोतासाठी
कुणी |
संसारी खिळूनी| राहिलेला ||
देह जाईस्तोवर | पोट राहणार
|
गोत वाढणार | प्रतिदिनी ||
किडा मुंगीयांचे | पोट भरे
रोज |
पाखरास भोज | फळादिक ||
मागे धुंडू जाता | जग गणगोत |
बांधले सूत्रात | विश्वरूपी
||
निघ रे विक्रांत | दारी
यमदूत |
सारी यातायात | व्यर्थ मग ||
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/
रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६
शनिवार, १२ नोव्हेंबर, २०१६
चितेच्या भस्मात
भ्रमाचा भोवरा | संसार हा सारा |
धनमान दारा | फास गळा ||
रुतु दे मनात | शब्दांचे हे बाण |
कृपेचे प्रमाण | देई देवा ||
अहा अपमान | वाटे किती छान |
अहंचे निधान | लुटू जावे ||
माया सखे बाई | तुटो तुझा चुडा |
उलथो करंडा | कुंकुवाचा ||
मरावा विक्रांत | जावो सरणात |
चितेच्या भस्मात | महाकाळी ||
डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
गुरुवार, १० नोव्हेंबर, २०१६
माझा हा निरोप
माझा हा निरोप | द्या माझ्या
देवास |
धरुनी देहास |आहे इथे ||१ ||यावी आठवण | दीनाची दयाळा |
लाभावी जीवाला | कृपा दृष्टी ||२ ||
भाग्ये अंकुरावे | देहाचे या बीज |
जन्मा आलो काज| काही व्हावे ||३ ||
अंगी नाही बळ | जगणे लाचार |
परी पदावर | थारा द्यावा ||४ ||
भक्त कैवारी तू |प्रभू गिरनारी |
विक्रांतास दूरी | ठेवू नको ||५ ||
https://kavitesathikavita.blogspot.in
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
आषाढीची चंद्रभागा
आषाढीची चंद्रभागा *************** आषाढीची रम्य दिसे चंद्रभागा क्षेम पांडुरंगा देत असे मातीचा हा रंग घेत चंद्रभागा वाहतसे गंग...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
व्यापून ***** आज तू व्यापून मनास आषाढीच्या नभागत तेच आभाळ स्मृतीचे घेवून साऱ्या अवकाशात डोळे मिटता तुच चित्रात उघड्या डोळी तू...
-
एक लढाई अस्तित्वाची होती संपून गेली समोर त्या देहाची होती फुले विझली आकंठ संसारात ते मग्न मुली नातवात हिंदोळ्यावर सुखाच्या सद...
-
नारळ **** साधू आले साधू गेले थोडे करून नारळ ओले भिजली शेंडी करवंटी काहीतरी काम झाले पाणी आतले आत रहीले वर ओतले सुकून गेले म...
-
नर्मदा कृपा ******** नव्हतीच खात्री जराही मजला परी तू हाताला धरीलेस ॥ नव्हते ठावुक चालेल की नाही धाडस तरीही केले काही ॥ होतीच...
-
मेट्रन दुर्गा चौधरी (निवृत्ती दिनानिमित्त ) *********************" दुर्गा नाव असलेली आणि मेट्रन पदावर बसलेली व्यक्ती एवढी...
-
काजळ घातलेले तुझे रेखीव डोळे खुळ्या जीवाला भूल पाडणारे वेड्या मनाला साद घालणारे अगम्य कृष्णडोह चांदण्यात भिजलेले ...
-
वेडे गीत ******** एक वेडे गीत माझे मी तुला देणार होते मेघ ओंजळीत घेत सवे भिजणार होते त्या तुझ्या स्वरात मंद झोका झुलणार होते...
-
आधार ****** देव का रे कोपतो हा रागावून कुणावरी देव का रे धावतो हा आपल्या त्या कुणासाठी देव का रे राखतो हा दुजा भाव मुलांसाठी ...
-
तिसंगी गावची जत्रा *************** हिरव्या ओसाड गावी लोक थकली वाकली बाळखेळ पावुलांना माती होती आसुसली ॥१ शेत तापली धुपली रान...




