मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

औषधाने रोगी मरतो








औषधाने रोगी मरतो
ऐसे भाग्य या देशाचे
तसेही अर्धे मरणार होते
हिशोब कशाला अर्ध्यांचे

मरणाची सवय आम्हा
आम्ही चिमण्यांचा थवा
रोज एक झडप पडते
घेवून जाते एका जीवा

तसेही मरणा तयार असतो
एकाध चान्स घेवून बघतो
चार दिवस जगणार असतो
दोन दिवस लवकर जातो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, २४ नोव्हेंबर, २०१४

तुझ्यासाठी जन्मसारा






सखी माझी प्रीत आहे
रानातील वेडे गाणे
पानोपानी चैतन्याचे
कणोकणी बहरणे

वेडे खुळे झाड थोडे
रुपाकडे पाहू नको
छाया फुले बरसती
दूरवर जावू नको

सारे काही तुझ्यासाठी
मन खुळे रानफुले
तुझ्यासाठी अंथरले
हृदयही दव ओले

सजूनिया आला ऋतू
किती काळ ठाव नाही
तुझ्यासाठी जन्मसारा
तुझ्यासाठी मरणही

विक्रांत प्रभाकर


रविवार, २३ नोव्हेंबर, २०१४

प्रेमास हाड कर






जमलेच तर
एक काम कर
या माझ्या प्रेमा
आता हाड कर

खुळचट सारे
शोध सुखाचे
व्याकूळ भुकेल्या
पथ कुत्र्याचे

सवय जुनाट  
आहे वेड्याची
स्नेह सुखाची  
नि सहवासाची

उगाच भावूक
तू होवू नकोस  
खावू बोलावून
त्या देवू नकोस

थोडा कुई कुई
करेल तसा तो
तोंड खुपसून
रडेल उगा तो

प्रत्येक श्वानास  
जगणे असते
कधी रोटी  तर
कधी उकिरडे

विक्रांत प्रभाकर



झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...