जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०१४
बुधवार, ५ नोव्हेंबर, २०१४
श्री प्रेमदेवता
खूप दिवसांनी
भाग्य विनटला
दिस खरोखर
कारणी लागला
खूप दिवसांनी
पाहिले सखीला
अन चैन माझ्या
जीवास पडला
तोवर उगाच
पाहत वाटेला
तसल्ली दिधली
व्याकूळ जीवाला
भाग्य बरसले
सुख उमलले
प्रसन्न जाहले
मन कोमेजले
तसे मना तर
ओढ लागुनी
बसलोच होतो
उदास होवुनी
जणू तप तेच
होवून पूर्णता
अवतरली ती
श्री प्रेमदेवता
विक्रांत प्रभाकर
...जिंदगीचा लोच्या....
तसा तर जिंदगीचा
लोच्या साऱ्या झाला आहे
इस्त्रीचे कपडे वरी
रंग विटलेला आहे
सक्तीचीच पोटभरू
चिटकवली नोकरी
बळे सांभाळतो नाती
बांधलेली व्यवहारी
उपाशी मरण्याहून
हे सुद्धा वाईट नाही
पोट भरणे म्हणजे
पण जिंदगानी नाही
फेकायला हवे तेच
अविभाज्य झाले आहे
जीवनाने म्हणा जणू
कि गुलाम केले आहे
किती मारू रोज रोज
तेच तेच सात फेरे
बांधलेली गाठ आहे
मानुनिया उगा खरे
सुटकेचा मार्ग बंद
गाव गल्लीचा तुरुंग
छाती काढून चालणे
करणे मुक्तीचे सोंग
आणि काही करू जाणे
असते बंड फसणे
गळ्यामध्ये फास अन
फळीस दूर लोटणे
विक्रांत प्रभाकर
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
दिगंबर आजबे
स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...
-
दत्त रिक्त ******** दत्त भूत विसरला दत्त भविष्य नसला दत्त अस्तित्व होऊन याचं क्षणात साठला दत्त नाठवे मनाला दत्त नाठवे तनाला द...
-
आणि अचानक जाती हरवून मित्र प्रियजन विषाणूने ॥ कुणी काल झाले इथे रिटायर गावातले घर डोक्यामध्ये ॥ कुणी जीवनाच्या उभा मध्यावर ...
-
आरसा ****** तुझिया डोळ्यांनी मीच मला पाहतो वादळ संवेदनांचे कणाकणो वाहतो कविता तुझ्यावरी लिहून सुखी होतो तुला खुश करतो का मीच ...
-
वृक्ष ******* जेव्हा पडे बीज उत्तम मातीत सहज रुजत फळा येते ॥१ सफळ होताच पुण्यकर्म सारी बघ मुक्ती चारी घरी येती ॥२ तरारून...
-
स्वामींचा ******** तुच तू दयाळा कृपा अवतारा चैतन्य सागरा स्वामी राया ज्ञान सागरीचे मोती तू शोधून आणिले वेचून आम्हासाठ...
-
साखर फुटाने मावा पेढा राशी फुलांच्या ढिगात मन माझे साक्षी अवघा गोंधळ धनाचा कल्लोळ राग लोभ परी मिटला समूळ वदे ...
-
बंधन **** शब्दाच्या वाटेनं शब्दातिताच्या अंगणात जाणं तेवढे सोपे नसतं कारण आपल्याला शब्दाचा हात नाही सोडवत दिसणारा प्रत्येक क्षण...


