शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०१४

प्रेमच आहे ...





पाऊस माझा होता
उनही माझे आहे
देणे न देणे तुझे
सारेच माझे आहे

तुझे हात मागणे
जरी गुन्हाच आहे
तसेही बंदिवान
जगणे माझे आहे

स्वप्नातही स्पर्शास
उत्सुक तुझ्या आहे
भाजले परी हात
प्रेमात माझे आहे

उतावीळ सदैव  
तुझ्यासाठी मी आहे
टाळुनिया जगणे
घडत माझे आहे

कधीतरी कुणाचे
आसक्त होणे असे
देहधारी जरी ते
प्रेमच माझे आहे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




मंगळवार, १२ ऑगस्ट, २०१४

प्रीत लपविणार नाही





नाही सखी
या मनातून
नाही कधीच
उमटत नाही

आणि माझी
वेडी प्रीत
अजून मागे
सरकत नाही

सारे अडथळे
फोल असून
मार्ग मुळी
सापडत नाही

सदैव पेटले
प्राण तरीही
वर्षा मुळीच
मागत नाही

येशील कधी वा
येणार तू नाही
माझे जीवन
ओलांडून सहज
जाशील पुढेही

नाकारही मला
तो हक्क
आहे तुला
हट्ट तुझा मी
धरणार नाही

प्रीत पण
तुजवरची
मी आता
लपविणार नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, ११ ऑगस्ट, २०१४

हवी असते तू मला..





क्षणभर दिसणारी
कणभर मिळणारी
हवी असते तू मला
पूर्ण मन भरणारी
तुझा स्पर्श हवा मज
स्वप्न जाग आणणारा
तुझा श्वास हवा मज
देही प्राण फुंकणारा
तुझे हात हाती घ्यावे
माझे गाणे तूच व्हावे
मिटलेले जग जुने
पुन्हा बहरून यावे
पण तसे होत नाही
चंद्र हाती येत नाही
झाकोळून काळोखात
आस तडपत राही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, ७ ऑगस्ट, २०१४

मरण उर्मी







इवला देह विष पिवून
देतसे टाकून
कलेवर
कोवळा जीव मैथुनी मरुनी
जातसे मिटुनी
मातीमध्ये  
मरण उर्मी इवल्या मनी
व्यथा होवुनी
संपून गेली
आणि पिसाट लुब्ध विखारी
जाइ माघारी
जगायला
कसले जग नरक केवळ
खाटिक सबळ
गोरक्षक

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

महफ़िल

महफ़िल  ******* यारों के दिलदारों के टीकट आ रहे हैं ।   महफ़िलों के रंग सूने हो रहे हैं । तुम किस सुबह का इंतजार कर रहे हो?  ...