जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
शुक्रवार, १८ जुलै, २०१४
बुधवार, १६ जुलै, २०१४
पुन्हा रुजू येता प्रीत ...
मनातील प्रश्न सारे
मनामध्येच राहू दे
चुकलेल्या उत्तराने
वर्ष व्यर्थ जातात रे
तुटलेत धागे जरी
काही मनी जपावेत
पुन्हा रुजू येता प्रीत
नवे स्वप्न फुलावेत
जीवनाच्या वादळात
कधी कुणी हात देत
आतल्या जखमावर
हळूवार फुंकारत
संशयाची छाया मनी
पडूनिया देवू नको
हाती येता पुन्हा फुले
उधळून देवू नको
छोटेशीच जिंदगानी
भराभर वर्ष जाती
सुटल्याची खंत नको
सुटू देत खोटी नाती
अशी हास खळाळून
आनंदाने झळाळून
बाकी सोड सारे सारे
प्रीती कर उधाणून
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
मंगळवार, १५ जुलै, २०१४
सजवावे तुज ..
तुझे एकटेपण
तुझ्या ओठातून
उमटते काही
बहाणा घेवून
जरी दूरवर
सोडुनिया घर
मनाच्या अंगणी
स्मृतीचा सागर
मायावी जगात
मायावी शब्दात
हरवे स्वत:ला
उगाच कशात
तुझे थकलेले
व्याकूळ डोळे
मनात दाटले
आभाळ सावळे
मजला बेचैन
टाकती करून
वाटे सुखा मग
आणावे खेचून
हजार गाण्यांनी
हजार शब्दांनी
सजवावे तुज
हजारो स्मितांनी
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कोरलेले
कोरलेले ******* लिहले मनात काही पुसता सहज येते ह्र्दयात कोरलेले मिटता कधी न येते असतेच विश्व छोटे अदृष्य कधी कधी ते आकाश चांद...
-
गणेश आदीमायेच्या लेकरा रूप कुंजर सुंदरा मुळारंभ श्री ओंकारा माझे नमन स्वीकारा चौदा विद्येचा तू स्वामी न...
-
वारी ***** महाद्वारी दाटीवाटी लाखो भक्त चालतात आषाढीच्या सोहळ्यात धुंद होत नाचतात मैलोमैल रांग इथे तासोंतास लागतात क्षणभर भेटी...
-
एक लढाई अस्तित्वाची होती संपून गेली समोर त्या देहाची होती फुले विझली आकंठ संसारात ते मग्न मुली नातवात हिंदोळ्यावर सुखाच्या सद...
-
आधार ****** देव का रे कोपतो हा रागावून कुणावरी देव का रे धावतो हा आपल्या त्या कुणासाठी देव का रे राखतो हा दुजा भाव मुलांसाठी ...
-
पळस **** तो आकाशात झेपावणारा पळस सुंदर आणि हिरवागार जेव्हा कोसळला भूमीवर झेलत घाव देहावर मग त्या विशाल पानांनाही धरला नाही...
-
धुनी ***** माय नर्मदा प्रवाही गेला ओंडका वाहत किती पार केली गावे किती ओलांडले घाट जल गेले हरपून नील रत्न सागरात परी राहिला ओंड...
-
येई दत्ता असे आत्म राज्य देही वसलेला शोधे त्या भेटला म्हणतात ॥ बुजलेले पथ अडलेला वारा रान भुली खेटा घडतात ॥ कसे पाहू त...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
ॐकारेश्वर (नर्मदाकाठ च्या कविता ) ******** श्रद्धेचा व्यापार खुळखुळे भक्ती तरी देवा तिथे दिसे तुझी वस्ती इथे पूर्ण होती किती ...
-
वाट (नर्मदा काठावरील कविता) ******* देही सजलेली वाट मळलेली उधळून माती नभी दाटलेली तीच तीच वाट जरी पायाखाली हर दिन नव्या स्पर्...
.jpg)

