गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

कृष्णजी कधीतरी येतात




कृष्णजी कधीतरी येतात
अन मला आत
खूप खोलवर घेवून जातात .
ते आत जाण
असते मोठे विलक्षण
ते मुद्दाम जाणून बुजून
मुळी न येते घडून .
मग असे वाटत
इथेच राहावे
असाच फक्त
त्या क्षणी
मन उसळी मारत
त्याच त्याच्या चाकोरीत
घिरटया घालू लागत
त्या खोलीच मोजमाप करू लागत
विश्लेषण करू लागत
मनाच हे फोलपण जेव्हा मला जाणवत
तेव्हा अस वाटत
कृष्णजी राहावेत मजजवळ सतत 
(खर तर हा हि एक
मनाचाच डाव आहे
हे माझ्या येत लक्षात)
पण तसे घडत नाही
कृष्णजीचा सुटताच हात
मी पुन्हा येतो त्याच माझ्या जगात
वरवरच्या उथळ व्यवहारात.
अन अचानक बंद होतो
जाणिवेचा सतर्क प्रवाह
मी पुन्हा धाव घेतो अन वाचतो
कृष्णजींचे शब्द
पण कृष्णजी तेव्हा तेथे नसतात
मग मी राहतो वाट पाहत.
कधी तरी कृष्णजी येतील
अन मला घेऊन जातील
त्या खोलीवर स्थिरावून
माझ्या डुबक्या बंद होतील
मला माहित आहे
माझे हे स्वप्न हि
एक अडथळा आहे
एक पलायन आहे
वास्तवापासून
पण ते घडत आहे
अन मी पाहत आहे 

 विक्रांत प्रभाकर



मंगळवार, १८ डिसेंबर, २०१२

भिजलेले पान



भिजलेले पान

भिजलेली फांदी

भिजलेल्या फांदीवर

भिजलेले पक्षी

भिजलेली माती

गवताची पाती

गवताच्या पातीवर

पाण्याचीच नक्षी

पाण्याचे ओघळ

वाहती खळखळ

वाहणाऱ्या जळी

एक पोर अवखळ



विक्रांत  प्रभाकर
http://vikrantchishodhyatra.blogspot.in/

शनिवार, १५ डिसेंबर, २०१२

घर (एक हायकू )


आता ते घर
वाट पहिल्या विन
उघडे दार.
तसे पाहता
त्या रस्त्यावर नच
कुणी कुणाचे .
नुरले प्रेम
तरीही व्यवहार
असे शाबूत .
समोर येते
दोन वेळचे धड
रोज जेवण .
थोडे छप्पर
गॅलरीत त्या एक
जाड चादर .
ठरल्या वेळी
पण द्यावा लागतो 
पैका मोजून .
जो तो आपुल्या
जगात हरवून
प्रेमावाचून .
होता बहाणा
ते खोटे खेचणे नि
सुटणे गाठी.
 
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

मित्र भेटावा तसे





मित्र भेटावा तसे
एक पुस्तक भेटले
जागे करून गेले
पुन्हा एकदा llll
हृदयाच्या आत
घालीत हात
विझणारी वात
तेजाळली   llll
मरू मरू गेलेला
विश्वास जागवला
प्रकाशाचा लागला  
वेध पुन्हा  llll
कृणाईत त्या मी
जागल्या क्षणांचा
उघड्या डोळ्यांचा
झालो आज llll

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२

विमला ठकार






ज्ञानेश्वरानंतर मी प्रेम केले
ते विमालाजींच्या शब्दावर
हृदयात ते कोरून ठेवले
पुन:पुन्हा मस्तकी धरले
अर्थातच त्यांना ते
कधीच आवडले नसते
हे मला पक्के ठावूक आहे
तेवढे मी त्यांना जाणले आहे.

त्यांचे शब्द धारधार
जातात अगदी खोलवर
चिरत अंतकरण आत
उकलत जन्मांचे संस्कार
अमाप प्रेम, अपार करुणा
ओतप्रोत भरलेली त्यात
वाचता वाचता डोळ्यात
कितीदा आसवे ओघळतात
मेंदूत भूकंप होतात
प्रतिमा तुटून जातात
ती आसवे सुखाची असतात
आणि सुटकेचीही असतात
हरपलेले श्रेय सापडल्यामुळे
झालेल्या आनंदाची असतात .

काहीही अधिकार न गाजवता
मैत्रीचा ,स्नेहाचा स्पर्श न सोडता
आधार देतात प्रत्येकवेळेला
नाकारत आश्रय उदात्त
सांगतात उभे राहायला .

असे निर्मळ नम्र सशक्त
अव्यक्ताच्या दाराशी
नेवून ठेवणारे शब्द
ज्ञानरायांशी नाते सांगणारे
संतावर प्रेम करणारे
खडसावून कान धरणारे
मायेने पोटाशी धरणारे
या शब्दांवर प्रेम न करणे
हा करंटेपणा नाहीतर काय
इतकी ओजस्वी,
इतकी स्नेहल ,
इतकी स्पष्ट हि वाणी
जीवनात ध्यानाचे वरदान
घेवून न आली तर
अगा तू वाचलेस नाही 
असे म्हणावे लागेल

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, ६ डिसेंबर, २०१२

सत्तेची लॉटरी

सत्तेची लॉटरी
ज्या कुणा लागली
दुनिया लुटली  त्याने सारी 

करतो सलाम
आम्ही सारे षंड
हसरे थोबाड  तया पुढे

मागे देऊ शिव्या
बोटे सारी मोडू
हिम्मतीचे गांडू
ऐसे आम्ही

विक्रांत तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in/

जीवाभावाची मैत्रीण

 जीवाभावाची मैत्रीण
***************
आई  
तू  मैत्रीण माझी 
जीवाभावाची 
माझ्या श्वासात 
भरलेली 
गाणी तुझी 

आई 
तू घडविले 
या गोळ्याला 
जागविलेस
प्रतिभेला
शब्द दिलेस 
माझ्या कवितेला


तुला कळत 
नकळत 
तू होतीस ओतत 
अमृताचे घट 
या ह्र्दयात 

तू दाविलेस ते
जगणे जरी होते साधे 
रांधा वाढा उष्टि काढा 
घर बाजार आणि संसार 
यात अडकले सारे गाडे 

मातीचा सुगंध त्यात 
प्रेमाचा वर्षाव त्यात 
प्रेमाचे संगीत त्यात 
मुल्याचे दर्शन त्यात 
भक्तिचे वरदान त्यात
नितीचे आचरण त्यात 

जाहलो कृतार्थ 
दिप लावलास 
या ह्र्दयात 

तू भरवलेस घास 
दाविला जीवनात
सुपंथ


 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...