महाद्वार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाद्वार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २८ जुलै, २०२६

वारी

वारी
*****
महाद्वारी दाटीवाटी
लाखो भक्त चालतात
आषाढीच्या सोहळ्यात 
धुंद होत नाचतात 

मैलोमैल रांग इथे
तासोंतास लागतात
क्षणभर भेटीसाठी
किती किती श्रमतात

निर्विकार देव पण
उभा स्तब्ध विटेवर 
अन् कर्म चक्र धावे 
तयाच्या त्या गतीवर 

कुणा देव पावतो हा 
असे कुणी म्हणतात 
कुणासाठी धाव घेई  
पुन्हा पुन्हा संकटात 
 
परी दुःख जीवनाचे 
नच दिसे निवळले
त्याच ताप त्रयी दिसे 
जग असे पोळलेले

तया कृपे लाभवंत 
जरी थोडे भाग्यवंत
लाखो लोक मग इथे 
का रे उगा कष्टतात?

काय इथे वारी असे 
थोडाफार विरंगुळा?
दिर्घ श्वास संसाराचा
थोडा होण्यास मोकळा ?

समूहाचे संमोहन ?
असे काय खुळेपण?
परतून घरी येता 
तेच दिसते जीवन

येथ का रे घडते ना 
अमुलाग्र स्थित्यंतर
आला गेला विक्रांत हा 
फक्त भार पायावर 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 


वारी

वारी ***** महाद्वारी दाटीवाटी लाखो भक्त चालतात आषाढीच्या सोहळ्यात  धुंद होत नाचतात  मैलोमैल रांग इथे तासोंतास लागतात क्षणभर भेटी...