प्रत्येक कामगारात एक
संपकरी दडलेला असतो
वेळ येण्याची तो फक्त
वाट पाहत असतो .
तसाच प्रत्येक बायकोत
एक उद्वेग भरलेला असतो
स्थैर्य, सत्ता, पैसा
मिळण्याची वाट पाहत असतो
अन ज्या मूर्ख नव-याला
हे कधी ना कळतं
त्याच अगदी किसलेलं
खोबर होऊन जात
ज्यांना कळत त्यांचही
फारस वेगळ न होतं
पण स्वताहून किसायला
तयार होऊन गेल कि
किसले जाणेही
एन्जोय करता येत .
जवळ जवळ प्रत्येकाच
हेच प्राक्तन असतं
कुणाच लवकर येत
कुणाच उशिरा होत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा