मंगळवार, १२ जून, २०१२

आता जे होते ते होऊ दे

आता जे होते ते होऊ दे 
कालातून देह उगा वाहू दे.
देह माझा नाही 
मनही माझे नाही
उगाच फुगला बुडबुडा 
उगाच फुटून जाऊ दे.
वाहता वाहता नाती भेटली
वाहता वाहता तुटुन गेली
खंत जळल्या जुळल्याची 
मनी नच राहू दे.
दिशा न माहीत काही
दशाही कळ्त नाही
निरर्थकता अस्तित्वाची
अहंकारात उतरू दे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वस्त्र

फाटके वस्त्र ********* आधी देसी भक्ती मग ते दर्शन  आहे मी जाणून दत्तात्रेया ॥१ परी त्या भक्तीला करसी लायक  कृपेला कारक तूच देवा ...