गुरुवार, २८ जून, २०१२

दूर दूर रानात

दूर दूर रानात 
हिरव्या हिरव्या रानात
एक पाखरू नादात
आहे आपल्याशी गात

त्याचा सुर आकाशात
घुमला निळ्या नभात
भिजला इवल्या झ-यात
रुजला गर्द पाचोळ्यात

आकाशातला विमल वाट
गाऊ लागला त्या  सुरात
नाजुक निर्झर देवू लागला
किनकिनती हलकी साथ

भूमातेच्या उदरातुन
दोन आले इवले हात
त्या गाण्याचे शब्द लिहत
सृजनाला आकार  देत

             विक्रांत

२ टिप्पण्या:

  1. प्रिय विक्रांत,
    तू खूपच गोड, सुंदर कविता लिहिली आहेस, त्यातच थोडेसेच फेरफार केले तर "अष्टाक्षरी"त छान तालात (लयीत) येईल - बघ कशी वाटतीये आता - वाचताना, गाताना. (मुलगी दिसायला छान असली तरी "दाखवण्या"च्या कार्यक्रमात तिला नीट सजवायला / नटवायला नको का - मूळचेच सौंदर्य अजून उठून दिसते मग....)
    आगाउपणाकरता क्षमस्व.
    शशांक.

    दूर दूरशा रानात
    गर्द हिरव्या पानात
    एक पाखरु नादात
    आहे आपल्याशी गात

    त्याचा सूर आभाळात
    घुमे निळ्या त्या नभात
    भिजे इवल्या झ-यात
    रुजे गर्द पाचोळ्यात

    वाट विमल नभाची
    गाऊ लागे त्या सुरात
    देऊ लागे निर्झरही
    झुळझुळत्या स्वरात

    पोटातून भूमातेच्या
    दोन इवलाले हात
    शब्द लिहित गाण्याचे
    सृजनासी आकारत

    उत्तर द्याहटवा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...