बुधवार, २० जून, २०१२

नाती

तू खेचू नकोस उगा
गाठ सुटणार नाही
दोर तुटल्यावरी
वीण बसणार नाही .

तू हिसकावू नकोस
काही मिळणार नाही
सारे सांडेल भूवरी
तुज कळणार नाही .

बघ सांगतो तुला न
भीक मागुस काही
तू केलिया श्रमाची
का हवी भरपाई 

देण्याघेण्यात पण
प्रीत असणार नाही
ओढाओढित अन
नाती टिकणार नाही

                   विक्रांत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...