शुक्रवार, २९ जून, २०१२

न भेटलेले मित्र ,केदार मेहेंदळेची दाद

प्रत्येक कवितेला
केदार मेहेंदळेची दाद असते
कुणी काही लिहो
केदारला ते ग्रेट दिसते

हे खरे की ,
कुणाही कवीला छान म्हटले
की त्याला छानच वाटते
त्या छानमध्ये त्याला
आपलेच प्रतिबिम्ब दिसते

त्या छान साठीच तर
त्याचे लिहणे असते
अन एक छान वाचले की
छान एक कविता सुचते

कधी कधी वाटते
आपणही केदार व्हावे
सा-याच कवितांना अन
छान छान म्हणत सुटावे

पण केदारची दिलदारी
आपल्यात काही येत नाही
छान छान वाचूनही
आपण reply देत नाही

म्हणून तर केदारला
एक कड़क salute मारतो
खास त्याच्यासाठी अन
एक कविता लिहतो

विक्रांत

गुरुवार, २८ जून, २०१२

दूर दूर रानात

दूर दूर रानात 
हिरव्या हिरव्या रानात
एक पाखरू नादात
आहे आपल्याशी गात

त्याचा सुर आकाशात
घुमला निळ्या नभात
भिजला इवल्या झ-यात
रुजला गर्द पाचोळ्यात

आकाशातला विमल वाट
गाऊ लागला त्या  सुरात
नाजुक निर्झर देवू लागला
किनकिनती हलकी साथ

भूमातेच्या उदरातुन
दोन आले इवले हात
त्या गाण्याचे शब्द लिहत
सृजनाला आकार  देत

             विक्रांत

बुधवार, २० जून, २०१२

नाती

तू खेचू नकोस उगा
गाठ सुटणार नाही
दोर तुटल्यावरी
वीण बसणार नाही .

तू हिसकावू नकोस
काही मिळणार नाही
सारे सांडेल भूवरी
तुज कळणार नाही .

बघ सांगतो तुला न
भीक मागुस काही
तू केलिया श्रमाची
का हवी भरपाई 

देण्याघेण्यात पण
प्रीत असणार नाही
ओढाओढित अन
नाती टिकणार नाही

                   विक्रांत

शुक्रवार, १५ जून, २०१२

नव-याचे प्राक्तन


प्रत्येक कामगारात एक
संपकरी  दडलेला असतो 
वेळ येण्याची तो फक्त
वाट पाहत असतो .
तसाच प्रत्येक बायकोत
एक उद्वेग भरलेला असतो
स्थैर्य, सत्ता, पैसा
मिळण्याची वाट पाहत असतो
अन ज्या मूर्ख नव-याला
हे कधी ना  कळतं
त्याच अगदी किसलेलं
खोबर होऊन जात
ज्यांना कळत त्यांचही
फारस वेगळ न होतं
पण स्वताहून किसायला
तयार होऊन गेल कि
किसले जाणेही
एन्जोय करता येत .
जवळ जवळ प्रत्येकाच
हेच प्राक्तन असतं
कुणाच लवकर येत
कुणाच  उशिरा होत

वेदनेने भरलेले शरीर आणि मन

गुरुवार, १४ जून, २०१२

केक शॉप मधे उंदीर

केक शॉप मधे  उंदीर
क्रीम खात  होता
पिटुकला भर प्रकाशी
भलता धीट होता .

मांडी  मस्त घालून
हाती गोळा घेउन
छान सजल्या ट्रे ला
घर आपले समजत होता.

लुकलुकनारे डोले इवले
तुकतुकीत  कांती
इवलाले शेपुट आपले
उगाच सावरीत होता

विकणारी होती ढिम्म
चेह -यावर भाव नव्हता
सांगुनही तिने केला
कान मुळी  न ऐकता

बरा दिसला बा आम्हाला
आभार म्हटले त्याला
घेता घेता आणि ठेवला
केक मनी  जो भरला होता

बुधवार, १३ जून, २०१२

माझे गाव



 नदीकिनारी गाव हिरव्या कोकणी इवले
नाही दिसणे दाखवणे गर्द झाडीत लपले
दाट करवंदाची जाळी काही नारळ पोफळी
आंबा फणसाची कुठे स्वारी ऐटीत बसली
लाल मातीने  तिथल्या पाय माझे  रंगवले
ओढ्या डोहानी असे नित्य जगणे शिकवले
भोळी ठाकर प्रेमळ उभे उद्दाम कातळ
घर तिथले प्रत्येक माझे अजून आजोळ
पूर बेफान तिथला माझ्या नाचतो नसात
वेग  तुफान वा-याचा सळसळतो श्वासात
हिरवी भाताची खाचर  मंद वा-याने हाले
पाटी झुळझुळते पाणी  गाणे  मनात फुले
देह वाहतो मी  इथे पोट भरत्या जगात
गाव स्मरतो सदैव माझ्या व्याकूळ मनात

विक्रांत
 http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १२ जून, २०१२

आता जे होते ते होऊ दे

आता जे होते ते होऊ दे 
कालातून देह उगा वाहू दे.
देह माझा नाही 
मनही माझे नाही
उगाच फुगला बुडबुडा 
उगाच फुटून जाऊ दे.
वाहता वाहता नाती भेटली
वाहता वाहता तुटुन गेली
खंत जळल्या जुळल्याची 
मनी नच राहू दे.
दिशा न माहीत काही
दशाही कळ्त नाही
निरर्थकता अस्तित्वाची
अहंकारात उतरू दे

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...