जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
बुधवार, २७ जुलै, २०१६
शनिवार, २३ जुलै, २०१६
श्रावण
आजकाल श्रावणात
मन ओले होत नाही
चिंब ऋतू भोवताली
डोळा पाणी येत नाही
लाख सुखे लगडली
देहास भिडत नाही
वृथा छंद जीवास का
लागला कळत नाही
समजेना का अजुनी
मना उमजत नाही
श्वासामध्ये
भिनलेले
स्वप्न हे जळत
नाही
तप्त अथांग
तृष्णा ही
जीवना सोडत नाही
वर्षावात जळे जन्म
हृदयात दत्त नाही
डॉ.विक्रांत प्रभाकर
तिकोने
kavitesathikavita.blogspot.in
kavitesathikavita.blogspot.in
शुक्रवार, २२ जुलै, २०१६
एक फेसबुक फ्रेंड
तू भेटलीस अन
माझ्या
जीवनाचा पासवर्डच
बदलला
अन मग पुन्हा
पुन्हा लॉगीनचा
सिलसिला सुरु
झाला
तुझ्या
माझ्यामध्ये हॅकिंगला
कुणालाच जागा
नव्हती कधी
तुझी माझी अगदी गट्टी
फायरवाल मधली
होती
व्ह्यायरस
मालवेअर वगैरे
तर फार लांबच्या
गोष्टी होत्या
व्हॉटसप फेसबुकवरील
भेटी
त्या अगदी
नित्याच्या होत्या
काय काय शेअर
केले मी तुला
कविता चित्रांनी
वॉलच भरून टाकला
नको त्याही
गोष्टी सांगून टाकल्या
हसत पण तू सावरून
घेतलेस मला
पण तरीही तू कधी
भेटली नाहीस
अन भेटायला ये म्हटली
नाहीस
पण खरच सांगतो
त्याची
गरजही मला वाटली
नाही
मायावी हे जग असते
सारे
असे म्हणतात
ज्ञानी सगळे
तसे तर जगणेही
व्ह्र्रच्युअलच असते
हे ही मी होते कुठेतरी
वाचले
मग जी मला वाटते
अन भेटते
तू तीच नसशीलही
कदाचित
अन मलाही दिसतो
तसे
जाणत नसशील तूही कदाचित
पण तुझ्या माझ्या
भेटण्याने
जगणे किती वेगळे
झाले
एक नवा आयाम जीवनाला
अन खोली कळण्याला
देवून गेले
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
वृक्ष वंश उच्छेद
वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते तोडताच झाड मन कळवळते एकेक झाडात लक्षावधी जीव राहतात प्रेमाने करुनिया गाव ...
-
आळंदी निवासी ************ आळंदी निवासी तुम्ही भक्त थोर संतांचे माहेर झाला असे ॥१ काय वाणू तुम्हा जन भाग्यशाली जणू निवडली रत्ने...
-
वृक्ष शोक ******** प्रत्येक झाड वाचलं पाहिजे . जंगलापासून गावापर्यंत . गावापासून गल्लीपर्यंत गल्लीपासून कुंडीपर्यंत . प्रत्येका...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
महातेजा ******** माझ्या जीवलगा प्रिय ज्ञानराया येऊ दे रे दया तुज माझी ॥१ देई गा भरून फाटकी ही झोळी प्रकाशाचा भाळी टिळा लावी ॥२ ...
-
झाडे मरतात ********** असे कसे हे रे असे कसे जिकडे तिकडे भरतात खिसे . तोडता भरती खिसे लावता भरती खिसे खिशात पैशाचे जणू की झाड असे...
-
वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते तोडताच झाड मन कळवळते एकेक झाडात लक्षावधी जीव राहतात प्रेमाने करुनिया गाव ...
-
दारी आलो ******* केली खटपट आणि दारी आलो तुजला भेटलो कृपा तुझी जरी अट्टाहास देवा माझा वेडा अदृश्याचा खोडा होता मागे किती अडकल...
-
कृष्णजी कधीतरी येतात अन मला आत खूप खोलवर घेवून जातात . ते आत जाण असते मोठे विलक्षण ते मुद्दाम जाणून बुजून मुळी न येते...
-
समजाविता कुणास मीच भारावून गेलो कळेना कसा मजला मीच हरवून आलो ठाव नसे काही पण नवीन होवून आलो नाव गाव सांडूनिया जग...
-
।। दत्त तारीतो ।। ********** दत्त वारीतो दु:खा ला दत्त आणि तो सुखाला दत्त अंतरी भरला सदा तारी तो मजला || . दत्त आवरे मना...


