जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८
सोमवार, १ जानेवारी, २०१८
मोकळे केस तू
मोकळे केस तू !
रुपेरी कांतीचे
लेवून चांदणे
मोकळे केस तू
मिरवित येते
काजळ कोरले
दिठीत सजले
गाली ओघळून
तीट लावते
चालणे तुझे ते
इथले नसते
गमे स्वर्गातून
कुणी उतरते
ओठात लालस
गुलाब सजले
पाहून मनात
गाणे उधळते
पाहणे तुजला
काचते क्षणांचे
पण जगण्याचे
भान हरवते
वळवून मान
झटकून जाते
मनी खोल अन
गाठ ती बसते
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
रविवार, ३१ डिसेंबर, २०१७
गुरुवार, २८ डिसेंबर, २०१७
पुन्हा तो व ती !
पुन्हा तो व ती !
ती घट्ट डोळे मिटूनी
दृष्टी बाजू वळवूनी
बोले शब्द आठवूनी
तयास उगा टाळूनी
यत्न तिचे जाणून तो
चलबिचल पाहतो
जरी ह्रदयी ठेवीतो
परी काही न सांगतो
तिचा देह बांधलेला
जन्म कुठे वाहिलेला
मोह कसा मग मनी
प्रश्न असे पडलेला
खरे तर कुणालाही
उत्तर माहित नाही
असेल का हे कारण
नव्या जन्मासाठी काही ?
यात पण गैर नाही
मन काही वैरी नाही
प्रेमा येणे जन्मा असे
गोष्ट अघटित नाही
पण तिला ते पटेना
मनाचे मुळी कळेना
ठाम तिने मग पुन्हा
घट्ट बांधले
डोळ्यांना
किंचित हसला तो
ही
गेला पुढती
निघुनी
बघ भेटू या
फिरुनी
बोलुनी काहीसा मनी
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
भीक
******
हे ही बंद
सदा सर्वदा
सदा सर्वदा
अन ते ही
बंद दार
बंद दार
भिकेस आले
तेच ते मग
तेच ते मग
काही शिळे
शब्द उधार
शब्द उधार
मनातील
याचनेस या
याचनेस या
का भूक लागे
अनिवार
अनिवार
आसक्तीच्या
पात्री होता
पात्री होता
काळाकुट्ट
फक्त अंधार
फक्त अंधार
घर फुटू दे
व्योम तुटू दे
व्योम तुटू दे
मातीचा हा
मर्त्य आधार
मर्त्य आधार
नको पापण्या
तीर उजेडी
तीर उजेडी
व्यर्थ मांडला
असे व्यापार
असे व्यापार
नकोच पण ते
असणे होणे
असणे होणे
भास आभासी
खुळा स्वार
खुळा स्वार
गड गड गड
धडाम धुडूम
धडाम धुडूम
होऊन विजेचा
तीक्ष्ण वार
तीक्ष्ण वार
मिटल्या वाचून
मिटू मिटू दे
मिटू मिटू दे
सुटून सारे
हिशोब गचाळ
हिशोब गचाळ
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in बुधवार, २७ डिसेंबर, २०१७
शोधण्याचा क्षोभ
॥ शोधण्याचा क्षोभ ॥
थकलेला देह आता
मिटावासा वाटतो रे
नाहीपणात मी पुन्हा
हरावासा वाटतो रे ॥
कशासाठी जगायचे
कुणासाठी जगायचे
घनदाट एकांत हा
सरावासा वाटतो रे ॥
पाहूनी वाट बहुत
दिन उजाडत नाही
तमात या जीव आता
विरावासा वाटतो रे ॥
तसा तर काळ काही
आहे म्हणतात लोक
क्षुब्ध आकांत सुखाचा
हटावासा वाटतो रे ॥
वेदनांचा देह जीर्ण
बंदिवान मन आत
निरर्थक प्रवास हा
थांबावासा वाटतो रे ॥
असो नसो पुढे काही
थकलो शोधून तेही
शोधण्याचा क्षोभ सारा
बुडावासा वाटतो रे ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
सोमवार, २५ डिसेंबर, २०१७
ग्रंथ ज्ञान
पाहिले अपार
ग्रंथांचे प्रकार
ज्ञानाचा विस्तार
अवाढव्य ॥
पाहू जाता मीती
कळेना ती किती
बुद्धीचिया माथी
भार फक्त ॥
शब्दांचा पसारा
मनात मावेना
विक्रांत दिसेना
अनुभव ॥
कुठून ते आले
अन् कुठे गेले
बरडी वाहिले
जैसे जळ ॥
दत्त ज्ञानदेवा
करा हो उपाय
भरा हे ह्रदय
आत्मज्ञानी ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
धुनी
धुनी ***** माय नर्मदा प्रवाही गेला ओंडका वाहत किती पार केली गावे किती ओलांडले घाट जल गेले हरपून नील रत्न सागरात परी राहिला ओंड...
-
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे भावार्थ ******************************** अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनविणे मना आले वो माय...
-
येणारा प्रत्येक दिवस जगतो आपण म्हणजे तीच चाकोरी तोच नित्यक्रम एक मार्ग एक ठरलेली कृती अन पक्क्या प्रतिक...
-
गणराय ****** नागबंध ब्रहमसुत्र पिंगलेस शुंडावक्र रिद्धीसिद्धी दोन्हीकडे डोईवर स्वर्ण छत्र ॥ मदमस्त गंडस्थळ रक्त वर्ण सतीबाळ न...
-
मिठीत जगणे होते मिठीत मरण आले हाती जपायचे होते हातीच सारे संपले मोडुनी घर पडले स्वप्न मातीत सं...
-
तुझे डोळे ***** तुझे डोळे चांदण्यांचे बावरल्या हरीणीचे दूर कुठे अडकल्या गायीच्या गं दावणीचे . तुझे डोळे नवाईचे घनदाट...
-
धुनी ***** माय नर्मदा प्रवाही गेला ओंडका वाहत किती पार केली गावे किती ओलांडले घाट जल गेले हरपून नील रत्न सागरात परी राहिला ओंड...
-
नको तेच काज *****:***** नको तेच काज देऊनिया दत्त बसला हसत दूरवरी ॥ भरतेय पोट चालतेय घर वाहतो संसार पाठीवर ॥ करतो गुलामी ज...
-
झाकलिया घटीचा दिवा । नेणिजे काय झाला केधवा । यारीती जो पांडवा । देह ठेवी ...ज्ञानेश्वरी मरण ***** असे हवे रे सुंदर मरण ज्यात ओघळून जाईल ज...
-
देहाचा या वृक्ष हलतो डोलतो श्वासाच्या लयीत गरारा फिरतो डोळ्यांच्या गुहेत खेचरी ओढतो हर क्षण कण ...
-
नेमिनाथ देरासरी *************** नेमीनाथ देरासरी होता ऊर्जेचा सागर खाली नमिता श्रद्धेने माझी भरली घागर ॥ मूर्त उदार गंभीर लखलखीत ...






